85 सरपंच; 571 सदस्यांसाठी निवडणूक; कोपरगावात 26 गावांमध्ये उडणार रणधुमाळी

85 सरपंच; 571 सदस्यांसाठी निवडणूक; कोपरगावात 26 गावांमध्ये उडणार रणधुमाळी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव तालुक्यातील 26 गावांच्या कारभाराची चावी मतदार दहा दिवसानंतर कुणा एकाच्या हाती सोपविणार हे कळणार आहे. येथे पारंपरिक काळे-कोल्हे या दोन मातब्बर राजकारणी यांच्यातच या ग्रामपंचायतीच्या लढती होणार आहे. महानंदाचे संचालक राजेश परजणे यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्या म्हणून साकडे घातले पण कार्यकर्त्यांनी त्याला हरताळ फासला आहे. शिंगणापूर माहेगाव देशमुख, सडे, देर्डे, खोपडी, धारणगाव, करंजी, पढेगाव, रांजणगाव देशमुख, खिर्डीगणेश, चांदेकसारे, चासनळी, कोळपेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका गाजतील.

कोपरगाव विधानसभा मतदार संघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांचे प्राबल्य आहे. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे या त्यांच्या पारंपरिक विरोधक आहे. 74 सरपंच व 291 ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
26 ग्रामपंचायत निवडणुका या गावातील व कार्यकत्यांमधील एकमेकीच्या भाऊबंदकीतून लढल्या जातात, मात्र येथेही काळे – कोल्हे यांच्यातच विभागणी आहे.

870 ग्रामपंचायत सदस्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी निवडणुक रिंगणात 571 उमेदवार उरले आहे. थेट जनतेतून सरपंचाच्या 26 पदासाठी 85,उमेदवार रिंगणात आहे. या 26 ग्रामपंचायतील मागील पंचवार्षिकला जे पक्षीय बलाबल होते ते याही निवडणुकीत तसेच राहिल त्यात फारसा बदल होईल असे वाटत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news