नगर : कोपरगावातील 78 इमारती बनल्या धोकादायक !

नगर : कोपरगावातील 78 इमारती बनल्या धोकादायक !
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील तब्बल 78 इमारती घरे, धोकादायक बनल्या आहेत. मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नगरपालिकेच्या बांधकाम विभाग शहर अभियंता विभागाच्या केलेल्या सर्व्हे मधून ही माहिती समोर आली आहे. संबंधित इमारतींमुळे दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या 78 मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती, घरे गावठाण भागात आहेत. त्या इमारती धोकादायक आहेत, इतरही इमारतींना धोका पोहोचून जीवितहानी होण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. धोकादायक इमारती उतरवून घ्याव्यात, असे नोटिसीतून म्हटले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या जात आहेत. शहर परिसरात अनेक वर्षांपूर्वीचे वृक्ष असल्याने यापूर्वी झाड कोसळून अपघात झाले आहेत. त्यातील अनेक वृक्ष आता धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात कधीही हे वृक्ष कोसळून अपघात होऊ शकतात. शहरात अनेक धोकादायक इमारती आहेत. सर्व इमारत मालक आणि त्यातील कुळांना त्याबाबत कळविण्यात आले आहे. काही इमारतींबाबत न्यायालयीन दावे सुरू आहेत. अत्यंत धोकादायक इमारतीच्या मालकांना अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक शक्य तितक्या इमारती उतरून घेण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार शहरातील तमाम जीर्ण व पडावू तसेच 30 ते 40 वर्षावरील इमारत धारक, जागा मालक, भोगवटाधारक आहेत. भाडेकरु यांना सुचित करण्यात बजावलेल्या नोटिसा मधून पावसाळा सुरु होणार असल्याने जीर्ण व मोडकळीस असलेल्या इमारतींची पडझड होत असते. याकरीता आपल्या जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारती दुरुस्ती करण्यासंबंधी अथवा इमारत उतरवून घेणेसंबंधी नगरपरिषद परवानाधारक यांचे मार्फत इमारतीचे (रचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र) घेवून नगरपरिषद कार्यालयात रितसर अर्ज करुन सादर करावे. तसेच इमारती पावसाळा सुरु होणार असल्यामुळे दुरुस्त करुन संभाव्य अपघात टाळावा.

पडावू असलेल्या इमारतीचा पडावू मुदत भाग पडल्यास व त्यापासून काही जिवित अगर वित्तीय हानी झाल्यास त्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही. त्याची माहिती सर्वस्वी जबाबदारी घरमालक, जागा मालक,भोगवटादार, भाडेकरू यांचीच राहील यांची संबंधीतांनी गंभीरपणे नोंद घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

कोपरगांव शहरात नदीकाठी अनाधिकृतपणे अतिक्रमण करुन राहणा-या नागरीकांना सुचित करण्यात येते की, पावसाळा सुरु होत असल्याने पावसाळयात अतिवृष्टीमुळे किंवा सततधार पावसामुळे नदी व नाल्यास पुर येण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठावरील व नाल्याचे काठावरील अनाधिकृत अतिक्रमित झोपडया,घरे , बांधकामे इतरत्र हलविण्याची व्यवस्था करुन जिवित अगर वित्तिय हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पालिका जबाबदार राहणार नाही
पावसाळयात पूर येवून आपली घरे वाहणारे नागरीक यांचे आर्थिक नुकसान व जिवितहानी झाल्यास त्यास नगरपरिषद अथवा शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देता येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी आपली असणार याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद कोपरगाव यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news