चांदेकसारे शाळेचे रुप पालटणार; नव्या इमारतीसह दर्जेदार शिक्षणही : आ.काळे | पुढारी

चांदेकसारे शाळेचे रुप पालटणार; नव्या इमारतीसह दर्जेदार शिक्षणही : आ.काळे

चांदेकसारे : पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गात चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलची इमारत बांधित झाली. या इमारतीचा व जागेचा जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला. मात्र आता तीन कोटी रुपयांतून आता या स्कुलची इमारत सुसज्ज होणार आहे. शिवाय येथून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणही मिळेल, असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते हे भुमीपूजन झाले.

आ. काळे यांनी भारत सर्व सेवा संघ पाचेगाव संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, सचिव प्रकाशराव जाधव, संचालक शंकरराव चव्हाण, संचालक सुनील होन यांनी परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहण्यासाठी 20 लाख रुपये खर्च करून पत्र्याच्या शेडमध्ये दोन वर्षे शिक्षण दिल्याचे आवर्जुन सांगितले. तर महंत रमेशगिरीजी महाराज यांनी चांदेकसारे परिसराच्या दृष्टीने न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे नक्कीच शैक्षणिक वैभवात भर टाकेल, असे आशीर्वाद दिले.

यावेळी भारत सर्व सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, सचिव प्रकाश जाधव, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, शिवाजी आढेराव, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, गंगाधर औताडे, विष्णूजी शिंदे, रोहीदास होन, सुनील शिंदे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे, महेंद्र वक्ते, रवींद्र देशमुख, अनिल शिंदे, प्रकाश गोरसे, , मुख्याध्यापक कल्याणराव होन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक चाँद शेख तर आभार अध्यक्ष राजेंद्र नलगे यांनी मानले.

हेही वाचा

Back to top button