‘एकविरा’मुळे महिला खेळाडूंना संधी : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

‘एकविरा’मुळे महिला खेळाडूंना संधी : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : क्रिकेटमध्ये भारतीय मुलींची कामगिरी ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत असून कॅन्सरतज्ज्ञ डॉ.जयश्री यांच्या संकल्पनेतून एकविराच्या वतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धा व विविध क्रीडा स्पर्धांमुळे तालुक्यातील मुली व महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच महिला क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध गाव व विद्यालयांमधील 71 क्रिकेट संघ तर रस्सीखेचसाठी 65 संघ सहभागी झाले आहेत.

या स्पर्धा चार दिवस सुरू राहणार असून सर्वांसाठी मोफत प्रवेश आहे. स्पर्धेच्या उद्घाटप्रसंगी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, कांचनताई थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, पद्माताई थोरात, सुनंदा जोर्वेकर, शितल उगलमुगले, डॉ.प्रा.वृषाली साबळे, सुरभी मोरे, शर्मिला हांडे, तृष्णा औटी, समिता गोरे, अहिल्या ओहोळ आदी उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त मोठ्या उत्साहात 2330 विद्यार्थिनी व महिलांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धांना प्रारंभ झाला. क्रिकेटच्या 30 यार्ड सर्कलवर उभे राहून सर्व खेळाडू महिलांनी यावेळी पाहुण्यांना मानवंदना दिली. डॉ. सुधीर तांबे व दुर्गाताई तांबे यांनी महिला व विद्यार्थिनींनी स्पर्धेत घेतलेला सहभाग हा अत्यंत आनंददायी असल्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात डॉ.जयश्री थोरात यांनी एकविरा फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. वृषाली साबळे तर, डॉ.विशाखा पाचोरे यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button