तुतारीच्या निनादात स्वाभिमानाचा निर्धार : आमदार प्राजक्त तनपुरे

तुतारीच्या निनादात स्वाभिमानाचा निर्धार : आमदार प्राजक्त तनपुरे
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य रयतेचे राज्य असावे म्हणून परकीयांशी लढा दिला. जनसामन्यांना पाठबळ देत छळ करणार्‍यांना अस्मान दाखविले. आज मात्र शिवरायांचे नाव घेऊन राज्यकर्त्यांकडून शेतकर्‍यांचा छळ सुरू आहे. राज्यातील छळ करणार्‍यांचा कडेलोट करण्यासाठी प्रत्येक जण पेटून उठला आहे. देशासह राज्यात लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी सर्वानी एकसंघ होण्याचे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळाव्यात ते बोलत होते. तुतारी चिन्हाचे आनावरण करताना शिवरायांच्या काळातील शस्त्रांचे प्रदर्शन तसेच पोवाड्याने शिवरायांचा गजर होऊन तुतारीचा निनाद करण्यात आला. आ. तनपुरे यांनी सत्ताधारी भाजप तसेच शासनाच्या ध्येय धोरणांवर सडकून टीका केली.

गद्दारी करून स्वार्थ साधण्यापेक्षा स्वाभिमान जपण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. राहुरीची जनता स्वाभिमानी असून गद्दारीला थारा देणार नाही. आणखी सात महिने कळ काढा. फितुरांची सत्ता गेल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडी सत्तेवर विराजमान होईल, असा विश्वास आ. तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोना काळात दार लावून बसलेले आता दुसर्‍याचा पदर धरुन मतदानाच्या लालसेने फिरकू लागले आहे. एकटे या मग खरी किंमत कळेल, असा टोला आ. तनपुरे यांनी नामोल्लेख टाळत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना लगावला. प्रवक्ते विकास लवांडे यांनीही महायुती सरकारवर टिकास्त्र सोडले. अबकी बार 400 पार म्हणजे फुसका बार असून आगामी निवडणुकीत भाजप तडीपार होईल, असे लवांडे म्हणाले.

माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, अमोल वाघ, रघुनाथ झिने यांनी मनोगत व्यक्त केले. काँगे्रस अध्यक्ष बाळासाहेब आढाव, शिवशंकर राजळे, संदिप वर्पे, रोहिदास कर्डिले, प्रेरणा पतसंस्थेचे सुरेशसेठ वाबळे यावेळी उपस्थिती होती. सुत्रसंचालन संतोष आघाव यांनी तर आभार एम.डी. सोनवणे यांनी मानले.
मेळाव्यासाठी बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार, रविंद्र आढाव, सुरेशराव निमसे, भारत तारडे, विजय डौले, सुनिल अडसुरे, बाळासाहेब खुळे, रखमाजी जाधव, सरपंच प्रभाकर गाडे, विश्वास पवार, साहेबराव दुशिंग, डॉ. राजेंद्र बानकर, नितीन बाफना, सचिन भिंगारदे, राहुल गवळी, विजय पालवे, जालिंदर वामन, पिनु मुळे, अंबादास डमाळे, भिमराज सोनवणे, इलियास शेख, रामेश्वर निमसे, अभिजित ससाणे, डॉ. राम कदम, दत्तात्रय रोकडे, संतोष पटारे, श्रीकांत घोरपडे, किशोर शिकारे, सर्जेराव मते, नाथा चव्हाण, निखिल शेलार उपस्थित होते.

राहुरी ग्रामीण रुग्णालय शहरातच असावे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात सांगितले होते. परंतू आता शहराबाहेरील स्टेशन रोडला रुग्णालय इमारत बांधकामाचा शुभारंभ आटोपून घेण्यात आला. पोलिस,महसूलसह इतर शासकीय कार्यालय शहराबाहेर हलवून शहराचे वैभव घालविण्याचा घाट विरोधकांकडून घातला जात आहे.

– प्राजक्त तनपुरे, आमदार

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news