शार्दुलने बनवले दिव्यांगांसाठी ‘ट्रायसिकल व्हिलचेअर’ मॉडेल

शार्दुलने बनवले दिव्यांगांसाठी ‘ट्रायसिकल व्हिलचेअर’ मॉडेल

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा :  आपल्या वाट्याला आलेले दिव्यांगत्व स्वीकारून आपल्यासह अन्य दिव्यांग विद्यार्थ्यांचे आयुष्य सुखकर व्हावे, दिव्यांगत्वावर मात करून स्वावलंबी जीवन जगावे या उद्देशाने राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील शार्दुल विकास राऊत यांनी स्वयंचलित 'ट्रायसिकल व्हिलचेअर' मॉडेल विकसित केले. नुकत्याच झालेल्या 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनातही शार्दुलला हे मॉडेल दाखविण्याची संधी मिळाली होती. आता या मॉडेलच्या पेटंटसाठी प्रयत्न करणार असल्याचे शार्दुल अभिमानाने सांगत आहे. टाकळकरवाडीत इयत्ता सातवीत शिकत असतानाच शार्दुलने हे ट्रायसिकल व्हिलचेअरचे मॉडेल विकसित केले आहे. तेव्हा त्याने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात हे मॉडेल सादर केले.

मॉडेलविषयी बोलताना शार्दुलने सांगितले की, माझ्यासारखे दिव्यांग असलेल्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. शाळेत गेल्यानंतर व्हिलचेअरवरून वर्गातील बाकावर बसणे, स्वच्छतागृहातील कमोडचा वापर करणे, प्रवासादरम्यान वाहनात चढणे असो की घरातील लहान-मोठ्या कामांसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहावे लागते. आपण दुसर्‍यावर विसंबून राहता कामा नये यासाठी 'ट्रायसिकल व्हिलचेअर' मॉडेल विकसित केल्याचे त्याने सांगितले. शार्दुलच्या या मॉडेलनुसार व्हिलचेअर तयार झाल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. या मॉडेलला पेटंट मिळावे आणि त्याचा जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी त्याच्या शिक्षिका, पालक प्रयत्न करणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news