Nagar : वीजतारांची ठिणगी पडून 10 एकर ऊस खाक | पुढारी

Nagar : वीजतारांची ठिणगी पडून 10 एकर ऊस खाक

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीज वाहक तारांचे घर्षण होवून ऊस पिकामध्ये थिणग्या पडून डॉ. प्रकाश आदक व शेजारील ससाणे यांचा सुमारे 10 एकर ऊस व ड्रिपचे पाईप खाक झाले. राहाता तालुक्यातील ममदापूर शिवारात भर उन्हात हे अग्नितांडव झाल्याने आदक व ससाणे कुटुंबियांची मोठी धावपळ उडाली. आगीत विलास उत्तमराव आदक यांचा 2 एकर, सुमनबाई उत्तमराव आदक दीड एकर, डॉ. प्रकाश मधुकराव आदक यांचा 2 एकर तर सुरेखा विलास ससाणे व कोमल ससाणे यांचा 5 एकर क्षेत्रातील उभा ऊस जळाला. आगीमध्ये आदक व ससाणे या शेतकर्‍यांचे सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. ‘महापारेशन’च्या वीज तारांना झोळ पडला आहे. वीज अधिकारी व कर्मचार्‍यांच्या गलथान कारभारामुळे विजेचे शॉर्ट सर्किट झाले. आगीच्या थिणग्या शेतात पडून आग लागली. प्रवरा साखर कारखान्याची अग्निशामक गाडी आल्याने आगीवर नियंत्रणात आली.

‘विजेच्या शॉर्ट सर्कीटमुळे आमच्या आदक परिवारासह शेजारचे ससाणे यांचा उभा ऊस पेटला. वीज कंपनीसह शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.
                                 डॉ. प्रकाश मुधकराव आदक, नुकसानग्रस्त शेतकरी

Back to top button