आगामी विधानसभा लढविणारच : डॉ. प्रणोती जगताप | पुढारी

आगामी विधानसभा लढविणारच : डॉ. प्रणोती जगताप

रुईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असून, सर्वांनी सहकार्य करावे. मतदारसंघातून महिलांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. प्रणोती जगताप यांनी या वेळी दिले. नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथे माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती जगताप यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून आगामी श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. या वेळी सरपंच विलास लोखंडे, उपसरपंच आशाबाई वाळके, प्राजक्ता भांबरे, एकनाथ गोरे, रोहिदास जगदाळे, बाळासाहेब खाकाळ, सागर गोरे, विलास भांबरे, संदीप गोरे, नवनाथ जगदाळे, विकी लोखंडे आदींसह महिला उपस्थित होत्या.

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघ सध्या अनेक कार्यक्रमांनी चर्चेत आला आहे त्यात आता माजी आमदार राहुल जगताप यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून डॉ. जगताप यांनी महिलांशी संवाद साधला.
रुईछत्तीशी गावातील मतदारांनी 2014 मध्ये विक्रमी मतदान करून राहुल जगताप यांच्यावर विश्वास दाखविला होता. राहुल जगताप यांनी प्रतिनिधीत्व करताना गावातील अनेक समस्या मार्गी लावून विकासकामे केली याची देखील त्यांनी आठवण करून दिली.
गालफुगीच्या आजाराने विद्यार्थी झाले बेजार!

हेही वाचा

Back to top button