रोहित पवारांच्या जामखेडमध्येच राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार | पुढारी

रोहित पवारांच्या जामखेडमध्येच राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषदेचे माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे पवन राळेभात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज (बुधवार, दि. 31) आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत चौंडी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा खिंडार पडले असून, राळेभात यांच्या भाजपप्रवेशाने आ. रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. या वेळी भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, डॉ. भगवान मुरुमकर, सचिन पोठरे, दादासाहेब रिठे, गौतम उत्तेकर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे, संपत राळेभात, प्रशांत शिंदे, खर्ड्याच्या सरपंच संजीवनी पाटील, जवळ्याचे सरपंच सुशील आव्हाड, राहुल पाटील, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, प्रवीण सानप, मोहन गडदे, डॉ. विठ्ठल राळेभात, उद्धव हुलगुंडे, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, जाकीर शेख, ज्ञानेश्वर झेंडे आदी उपस्थित होते.

खुनशी राजकारण भाजप करत नाही ः आ. शिंदे
भाजपच्या लोकांना त्रास देऊन झालेले प्रवेश पुन्हा स्वगृही परतत आहेत. तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख व जामखेडचे सरपंच (कै.) महादेव राळेभात यांनी हिंदुत्वाचा विचार ठेवला. आज पुन्हा पवनने भाजपची विचारधारा स्वीकारली आहे. पवन यांच्या माध्यमातून शहरात विकासाचे चांगले काम करता येणार आहे. अडवाअडवी व खुनशी पद्धतीचे राजकारण भाजप कधीच करत नाही, असे आ. शिंदे यांनी या वेळी सांगितले.

मतदारसंघ भाजपमय करणार ः राळेभात
माझे वडील महादेव राळेभात यांनी तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार रुजवला आणि आता पुन्हा जोमाने काम करत आ. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघ भाजपमय करणार असल्याचे पवन राळेभात यांनी या वेळी सांगितले.

Back to top button