श्रीरामपूरमध्ये भूकंपाचे धक्के? नागरिकांमध्ये भिती | पुढारी

श्रीरामपूरमध्ये भूकंपाचे धक्के? नागरिकांमध्ये भिती

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वार्ड नं. 7 व वार्ड नं.2 परिसरात सकाळी 10 ते 10ः30 वाजेच्या दरम्यान भूगर्भातून भूकंपासारखे 5 ते 6 हलकेसे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, या भूकंपाबाबत दिवसभर शहरात चर्चा सुरु होती. शहरात वार्ड नं. 7 मधील मोरगे वस्ती, वार्ड नं.2 मधील मिल्लत नगर भागात सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत तीनचारदा जमिनी खालून भुकंपासारखे धक्के जाणवले.

यामुळे खिडक्यांच्या काचांचा काहीवेळ थर्रऽऽऽर्र… आवाजही आला, मात्र हा भूकंप होता की, के. के. रेंजमध्ये होणार्‍या युद्ध सरावाचा परिणाम किंवा आणखी काय, हे मात्र निश्चित समजु शकले नाही. श्रीरामपूर येथे याच दरम्यान असे धक्के जाणवले, असे नागरिक सांगतात. मागील काही वर्षांपूर्वी असाच प्रकार जाणवला होता. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनाने पाहणी केली होती. त्याचप्रमाणे भुकांपाबाबत भूगर्भ आपत्ती व्यवस्थापनाने भूकंपाचे धक्के जाणवले तेथे पाहणी करावी. नागरिकांमधील भीती दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा

Back to top button