आरोप करण्यापेक्षा कर्तृत्व सिद्ध करा : खासदार सुजय विखे | पुढारी

आरोप करण्यापेक्षा कर्तृत्व सिद्ध करा : खासदार सुजय विखे

रुईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रसाद बनवण्यासाठी विखे परिवाराने स्वतःच्या खर्चातून संपूर्ण जिल्ह्यात साखर वितरण केले आहे. आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे. आपण कोण आहोत हे महत्त्वाचे नसून आपण जनतेसाठी काय करतो हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले. नगर तालुक्यातील रुईछत्तीशी, गुणवडी, मठपिंप्री, हातवळण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी दिलीप भालसिंग, अभिलाष घिगे, भाऊसाहेब बोठे, रभाजी सूळ, संतोष म्हस्के, संजय गिरवले, सुनील जगदाळे, भरत भुजबळ, रवींद्र भापकर, विलास लोखंडे, सुभाष निमसे, सुधीर भापकर, श्रीकांत जगदाळे, अंकुश गोरे, दीपक कार्ले आदी उपस्थित होते.

या वेळी प्रताप पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी भाजपच्या विकसित कामाची पद्धती सांगून जनतेसाठी अनेक योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन खा. विखे, पाचपुते, कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.
विरोधकांनी जनतेसाठी काय केले? लोकसभेला उमेदवार कोण राहील यावर नंतर बोलू, असे सांगून गावातील सर्व माता-भगिनींनी दि.22 रोजी लाडूचा प्रसाद करून गावातील हनुमान मंदिरात रामरायाचे पूजन करावे व महाप्रसाद प्राथमिक शाळेतील लहान मुलांना वितरित करावा, असे आवाहन केले. अध्यक्ष रमेश भांबरे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा

Back to top button