बंगळूरच्या भक्ताकडून साईचरणी अर्धा किलोचा सुवर्णमुकूट दान | पुढारी

बंगळूरच्या भक्ताकडून साईचरणी अर्धा किलोचा सुवर्णमुकूट दान

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  बंगळूरचे साईभक्त डॉ. राजाराम कोटा व परिवाराने मंगळवारी (दि. 9) 504.600 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. त्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत 29 लाख 4 हजार 982 रुपये असल्याचे सांगण्यात आले. भक्ती आणि दान याबाबत साईबाबांचे भक्त नवनवे विक्रम करत आहेत. 2023 या वर्षाच्या अखेरच्या दहा दिवसांत साईचरणी 16 कोटींचे दान टाकण्यात आले. 2024 च्या सुरुवातीलाच आज साई साईबाबा संस्थानाकडे हा सुवर्णमुकूट अर्पण करण्यात आला आहे. दरम्यान, साईबाबा संस्थानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी डॉ. राजाराम कोटा यांचा शाल व श्री साईंची मूर्ती देऊन सत्कार केला.

Back to top button