विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची 75 कोटींची फसवणूक | पुढारी

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची 75 कोटींची फसवणूक

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  खरीप हंगाम 2022 मध्ये जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असूनही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्याबाबत 76 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेतर्फे शेतकर्‍यांनी नेवासा व राहाता पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली या तक्रारी करण्यात आल्या. जिल्हाधिकार्‍यांनी सुमारे 76 कोटींची अधिकृत लेखी मागणी गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी महसूल व वन मंत्रालयाकडे केली आहे. परंतु याबाबत सदर रक्कम शेतकर्‍यांना मिळालीच नाही. याचा अर्थ संबंधित कंपनीने शेतकर्‍यांची 76 कोटींची फसवणूक केली असून, सरकार विमा कंपन्यांच्या संगनमतानेच शेतकर्‍यांची फसवणूक करत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

एक रुपयात पीक विमा योजनेपूर्वी शेतकरी स्वतः 2 टक्के, राज्य सरकार 9 टक्के व केंद्र सरकार 9 टक्के विमा हिस्सा भरत असे. म्हणजेच शेतकर्‍यांबरोबर राज्य व केंद्र सरकारची ही फसवणूक झाली आहे. राज्य सरकार तिजोरीतून हेक्टरी आठ हजार रुपये विमा कंपन्यांना देत आहे. परंतु विमा कंपन्यांकडून जिल्ह्यात फक्त सोयाबीन पिकाकरता अग्रीम विमा मंजूर केला आहे. तेही सर्व शेतकर्‍यांना मिळालेले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

 

Back to top button