शिर्डीत घाण करणार्‍यांनो, आता सावधान !

शिर्डीत घाण करणार्‍यांनो, आता सावधान !
Published on
Updated on

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : श्रीसाईबाबांच्या समाधी क्षेत्राचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिर्थक्षेत्र शिर्डीमध्ये आता स्वच्छता करणार्‍यांना दंडास सामोरे जावे लागणार आहे. नगरपालिकेच्या ठरावानुसार शिर्डीतील स्वच्छतेसाठी पालिकेने तब्बल 70 अधिकारी व कर्मचार्‍यांची 5 पथकांची स्थापना केली आहे.'एक धडा स्वच्छतेचा' या उपक्रमांतर्गत पथके दंडात्मक कारवाई करणार आहेत. शिर्डीत लोखो साईभक्त बाबांच्या दर्शनास येत असल्याने शहर स्वच्छ व सुशोभीत असणे आवश्यक आहे. नगरपरिषदेद्वारे शहरातील स्वच्छतेचे काम काटेकोरपणे करण्यात येते. तथापी, काही ठिकाणी नागरीक ओला व सुका कचरा घंटागाडीत न देता रस्त्याच्याकडेला टाकत असल्याचे निदर्शनास येते. कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो.

या पार्श्वभूमीवर 'एक धडा स्वच्छतेचा' उपक्रम राबविण्यासाठी नगरपरिषदेने ठरावाद्वारे मान्यता दिली आहे. शहरात घंटागाडीत कचरा न देणार्‍या, सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकून अस्वच्छता करणार्‍या व्यक्तींवर पालिका घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन उपविधी 2006 अंतर्गत दंडात्मक कारणार आहे. याद्वारे घंटागाडीत कचरा न देणार्‍या व सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करणार्‍या व्यक्तींवर नियंत्रण येईल. या उपक्रमाची धडक कारवाई सुरु करणार आहे. कायम स्वरुपी ती सुरु राहणार असल्याचे दिघे म्हणाले.

'शिर्डीत 'एक धडा स्वच्छतेचा' उपक्रम सुरु होत आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर काही नागरीक थुंकून अस्वच्छता पसरवतात. नागरीकांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी नगरपरिषदेद्वारे 'एक धडा स्वच्छतेचा' हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
                                                    -सतिश दिघे मुख्याधिकारी तथा प्रशासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news