नगर जिल्ह्यात 29 लाख टन उसाचे गाळप

नगर जिल्ह्यात 29 लाख टन उसाचे गाळप
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 11 सहकारी व 3 खासगी अशा 14 कारखान्यांनी 17 डिसेंबरपर्यंत 28 लाख 85 हजार 966 टन उसाचे गाळप करून त्यापासून 24 लाख 23 हजार 435 पोती साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा दैनंदिन साखर उतारा 14.89 टक्के मिळाला आहे. त्यात अंबालिका (जगदंबा) या खासगी कारखान्याने सर्वांत जास्त चार लाख टन उसाचे गाळप केले आहे.
काही प्रमाणात थंडी जाणवू लागल्यामुळे उसाचा उतारा वाढला आहे. अवकाळी पावसाची शक्यता पुन्हा व्यक्त झाल्यामुळे आगामी काळात शेतातील ऊस तोडून आणण्याच्या समस्या उद्भवणार आहेत.

ऊसतोडणी कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याने साखर कारखान्यांपुढे असलेला ऊस तोडायचा कसा हे प्रश्न निर्माण झाले आहेत. पीयूष, साईकृपा, प्रसाद, ढसाळ अ‍ॅग्रो, जय गजानन युटेक या पाच कारखान्यांची अद्ययावत गाळपाची आकडेवारी मिळू शकली नाही. केंद्र शासनाने उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी. हेवी मोलॅसेसपासून थेट इथेनॉल तयार करण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती अंशतः उठविल्यामुळे इथेनॉल निर्मिती करणार्‍या जिल्ह्यातील 11 कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. इथेनॉल निर्मितीतून मिळणार्‍या आर्थिक लाभातून शेतकर्‍यांना एफआरपीचा चांगला लाभ मिळण्याची आशा आहे. केंद्र शासनाने आठ दिवसांपूर्वी इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. सामान्यांना साखर जादा दराने घ्यावी लागू नये म्हणूनच केंद्र शासन सातत्याने काळजी घेत आहे.

साखर कारखान्यांचे गाळप, साखर पोती उत्पादन आणि दैनंदिन साखर उतारा
कारखाना गाळप(टन) साखर पोती उतारा
अंबालिका 4,51,375 3,98,300 11.45
मुळा 2,22,070 1,71,450 10.83
थोरात 2,71,520 2,54,810 11.00
अशोक 1,52,920 1,35,500 11.05
शंकरराव कोल्हे 2,06,993 1,49,575 –
शंकरराव काळे 2,18,523 1,98,400 10.11
ज्ञानेश्वर 3,04,000 2,79,750 10.83
नागवडे 1,94,612 1,94,800 10.93
पद्मश्री विखे 2,18,050 1,48,150 10.80
गणेश 37,800 23,250 10.53
गंगामाई 3,69,130 2,70,700 10.23
केदारेश्वर 99,590 75,850 9.10.20
वृद्धेश्वर 1,07,310 82,300 10.15
क्रांती शुगर 51,873 40,600 –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news