

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : अखेर शेवगाव तालुका दुष्काळीच झाला असून, खरीप पिकाची अंतिम आणेवारी पन्नास पैशांच्या आत जाहीर झाली आहे. त्यामुळे शासनाने शेवगाव तालुक्यासाठी सर्व शासकीय उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. यंदा निसर्गाचा अवमेळ झाल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडत राहिला. परिणामी खरीप व रब्बी दोन्ही हंगामातील पिकांना याची चांगलीच झळ बसली. गेल्या तीन-चार वर्षांपासून निसर्गात होणारा बदल पाहून आता शेतकरी खरीप व रब्बी, अशी पिकांची आवड निवड करताना दिसून येत नाही.
त्यामुळे अनेक रब्बीच्या क्षेत्रात शेतकरी खरीप पिके घेण्याचे प्रयत्न करीत आहे. अशाच प्रकारे तालुक्यात खरीप पिकांची 34 गावे असताना, रब्बीच्या 79 गावात खरीप पिकांचे क्षेत्र वाढले गेले आहे. याचा सारासार विचार करता प्रशासनाने 34 खरीप गावे व 79 रब्बी गावांत दोन तृतीयांशपेक्षा जास्त क्षेत्रात खरीप पीक पेरा झाल्याने, सर्व 113 गावांची अंतिम आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी जाहीर केली आहे. पावसाचा खंड व भाग बदलत पडलेल्या पावसाने खरीप पीक वाया गेल्याने सुधारित आणेवारी 50 पैशांच्या आतच जाहीर झाली होती. त्या पाठोपाठ अंतिम आणेवारीही अशीच जाहीर झाली आहे. तर, पेरलेल्या रब्बी पिकांची अवकाळी पावसाने नासाडी झाली आहे. या प्रकाराने शेवगाव तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात येत आहे. शासनाने या दुष्काळग्रस्त भागात शासनाच्या सर्व उपाययोजना सुरू कराव्यात. तसेच, शेतकर्यांच्या माथी असणारा कर्ज भाराचा विचार करून त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
वाडगाव, सालवडगाव, बेलगाव, कोळगाव, मंगरुळ बुद्रूक, राक्षी, बोधेगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, राणेगाव, शोभानगर, अमरापूर, आखेगाव ति, आखेगाव डो, वरूर बुद्रूक, वरूर खुर्द, भगूर, एरंडगाव समसुद, लाखेफळ, जुने दहिफळ, दादेगाव, ताजनापूर, बोडखे, अंतरवाली खुर्द ने, खानापूर, हातगाव, कर्हेटाकळी, मुंगी, कांबी, बालमटाकळी, गायकवाड जळगाव, खडके, मडके, चापडगाव, गदेवाडी, कुरूडगाव, घेवरी, दहिगाव ने, देवटाकळी, बक्तरपूर, ढोरसडे, भातकुडगाव, सुलतानपूर बुद्रूक, रांजणी, मजलेशहर, हिंगनगाव ने, सामनगाव, वडुले बुद्रूक, ढोरजळगाव शे, मलकापूर, गरडवाडी, ढोरजळगाव ने, आव्हाणे बुद्रूक, निंबेनांदूर, नांदूरविहिरे (49 पैसे). नजिक बाभुळगाव, माळेगाव ने, ठाकूर निमगाव, थाटे, आंतरवाली बुद्रूक, आंतरवाली खुर्द ने, हसनापूर, मंगरुळ खुर्द, वरखेड, सोनेसांगवी, सुळे पिंपळगाव, मुरमी, चेडेचांदगाव, लाडजळगाव, बाडगव्हाण, नागलवाडी, दिवटे, सेवानगर, कोनोशी, अधोडी, शिंगोरी, शेकटे बुद्रूक, सुकळी, शेवगाव, सुलतानपुर खुर्द, शहाजापूर, खरडगाव, मुर्शदपूर, एरंडगाव भागवत, ढोरहिंगनी, कर्जत खुर्द, खुंटेफळ, घोटन, तळणी, विजयपूर, दहिगाव शे, रावतळे, पिंगेवाडी, लखमापुरी, अंत्रे, खामपिंप्री नवीन, खामपिंप्री जुनी, सोनविहीर, प्रभुवाडगाव, ठाकूर पिंपळगाव, देवळाणे, शहरटाकळी, भायगाव, जोहरापूर, खामगाव, मळेगाव शे, लोळेगाव, आपेगाव, आखतवाडे, वाघोली, वडुले खुर्द, आव्हाणे खुर्द, बर्हाणपूर (48 पैसे) अशी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा :