देशाच्या विकासाला 9 वर्षांत मोठा वेग: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

देशाच्या विकासाला 9 वर्षांत मोठा वेग: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

एकरुखेः पुढारी वृत्तसेवा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 9 वर्षांत देशाच्या विकासाला मोठा वेग मिळाला. विविध क्षेत्रात प्रगतीने मोठी गरुडझेप घेतली. देशाच्या समृध्दीसह सामान्य माणसाच्या सुरक्षेचे कवच केंद्र सरकारने योजनांच्या माध्यमातून मजबुत केल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रेचा शिर्डी मतदारसंघातील प्रारंभ पालकमंत्री विखे पा. यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जि. प. मुख्य कार्य. अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, तालुकाध्यक्ष दीपक रोहोम, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, सरंपच मेघना दंडवते आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पा. म्हणाले, विकसीत भारत यात्रा सुरु करण्याचा देशातील पहिला प्रयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झाला. या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, योजनांपासून कोणी वंचित आहे का, याची उकल होईल. योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, या उद्देशाने सरकारी यंत्रणेप्रमाणेच पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनीसुध्दा या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचली. इतर बलाढ्य देशांना मागे टाकून, आर्थिक विकासामध्ये भारत देशाची प्रतिमा वेगळी झाली आहे. विकासाचा दर वेगाने पुढे जात आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. सेवा क्षेत्र ते पर्यटन क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण झाल्यामुळे आज इतर देश गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. भारतीय नागरीकांच्या पासपोर्टचा दर्जासुध्दा इतर देशांमध्ये उंचावल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारच्या माध्यमातून योजनारुपी कवच सामान्य माणसाला देण्याचे काम वेगाने होत आहे. देशाला विकसीत राष्ट्र बनविताना सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम 9 वर्षांत केंद्राच्या माध्यमातून झाल्याचे मंत्री विखे पा. यांनी ठणकावून सांगितले.

पंतप्रधान मोदी यांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रमाणालीव्दारे लाभार्थ्यांशी साधलेला संवाद सर्वांनी पाहिला. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माहितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button