Nagar : बसमधून डिझेल चोरणार्‍या एकास पकडले | पुढारी

Nagar : बसमधून डिझेल चोरणार्‍या एकास पकडले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वांबोरी येथे मुक्कामी असलेल्या एसटी बसमधून पहाटे डिझेल चोरताना दोन चोरट्यांना चालक व वाहकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, एक चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. दुसर्‍याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सुखदेव नाथु ढाकणे शेवगाव डेपो येथे बस चालक आहेत. 29 नोव्हेंबर 2023 रोजी सुखदेव ढाकणे व वाहक रामदास जर्‍हाड शेवगाव आगाराची एस. टी. (क्र. एम. एच. 14 बी. टी. 4386) बसमध्ये शेवगावहून राहुरीचे प्रवासी बसवुन निघाले. नंतर राहुरी येथे येवुन वांबोरी मुक्कामाकरीता बसमध्ये प्रवासी बसवुन सायंकाळी वांबोरी बस स्थानक येथे गेले.

बस तेथे मुक्कामी असल्याने चालक व वाहक जेवण करून गाडीमध्ये झोपले. यानंतर (दि. 30 नोव्हेंबर) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास गाडीच्या डिझेल टाकीजवळ आवाज आल्याने चालक व वाहकांनी खाली उतरून पाहिले असता, दोघेजण गाडीच्या डिझेल टाकीमधुन पाईपने डिझेल काढताना दिसले. एक चोरटा अंधाराचा फायदा घेऊन स्कुटी गाडीवरुन पसार झाला. चालक व वाहकांनी एकास जागीच पकडले. त्याचे नाव सचिन ऊर्फ बाळु राजेंद्र वाघमारे (रा. वांबोरी, ता. राहुरी) असे आहे. डिझेल चोरीची माहिती मिळताच वांबोरीचे पो. ना. पालवे तेथे आले. त्यांनी चोरट्यास ताब्यात घेवून पळालेल्या चोराची चौकशी केली असता, संजय चंद्रकांत वेताळ (रा. वांबोरी, ता. राहुरी) असे नाव असल्याचे सांगितले. या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button