Nagar News : मुक्त विद्यापीठात 70 कोटींचा गैरव्यवहार | पुढारी

Nagar News : मुक्त विद्यापीठात 70 कोटींचा गैरव्यवहार

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे प्रभारी म्हणून कामकाज पाहताना तब्बल तेथील कृषी विद्यापीठात बांधकाम विभागात 70 कोटी रूपयांचा खर्च करीत शासकीय नियम धाब्यावर बसवून गैरव्यवहार केल्याची तक्रार राज्यपाल रमेश जी. बैस यांच्याकडे करण्यात आल्याने विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राहुरी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचे अशोक तनपुरे यांनी तक्रार दाखल केली आहे.

तनपुरे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, कुलगुरू डॉ. पाटील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक) येथे प्रभारी म्हणून कामकाज करीत असताना त्यांनी सुमारे 70 कोटी रूपयांचे उपकरणे खरेदीत मोठा अपहार केल्याचे दिसत आहे. शासन आदेशानुसार 3 लाखापेक्षा अधिक रक्कमेची खरेदीसाठी निविदा मागविली जाते. कमी किंमतीत उपकरणे देणार्‍यांना निविदा दिली जाते, परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागातील विद्युत विभागातील कंत्राटी अभियंता व इतर अधिकार्‍यांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा उधळपट्टी झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

याबाबत सर्व लेखी दस्ताऐवज तनपुरे यांच्या हाती लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. हाती लागलेल्या पुराव्यानुसार अनेक कामांची बिले कामे होण्यापूर्वी मंजूर करण्यात आली आहेत. बहुतेक कामे व साहित्यांना कोणतीही गरज व परवानगी नसताना विद्यापीठ कुलगुरू व अभियंता यांनी निधी खर्च करण्यासाठी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी केल्याचे तक्रार अर्जात नमूद आहे. प्रभारी अधिकारी म्हणून खर्चास मर्यादा असतात, परंतु मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेत कुलगुरू व बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी तब्बल 70 कोटी रूपयांची उधळपट्टी करताना निविदा प्रक्रिया न राबविणे, परवानग्या न घेणे हे सर्वप्रकार करणे म्हणजेच शासकीय निधीचा गैरवापर केल्याचे दिसत आहे.

यामध्ये कुलगुरु डॉ. पाटील यांनी विद्यापीठाचे अभियंता यांना सहाय्यक अभियंताचे पद आहे, परंतु संबंधितांना कार्यकारी अभियंता पदाचे सर्वाधिकार देत कुलगुरू व अभियंता या दोघांनी संगनमताने गैरकारभार केल्याचा आरोप तनपुरे यांनी तक्रार अर्जात केला आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची नियुक्ती करावी. आर्थिक गुन्हे शाखा व लाचलुचपत विभाग यांचेकडे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी तनपुरे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. विद्यापीठातील गलथान कारभार चव्हाट्यावर आल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., खा. डॉ. सुजय विखे, आ. प्राजक्त तनपुरे यांनी या विद्यापीठात सुरू असलेल्या या अनागोंदी कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

कंत्राटी कर्मचार्‍यांकडे राजकीय नेते लक्ष देणार का?

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागात एका कंत्राटी अभियंता महिलेने आपल्याच नातलगांना कोट्यवधी रूपयांची कामे दिल्याच्या चर्चेने विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने विद्युत विभागासह इतर कंत्राटी कर्मचार्‍यांना दिवाळी सणापूर्वी थेट‘चले जाव’चे आदेश दिले. राहुरी हद्दीतील संबंधितांना बेरोजगार केल्यानंतर कंत्राटी कर्मचार्‍यांबाबत राजकीय नेत्यांची भूमिका महत्चाची ठरणार आहे.तेलक्ष्यदेणारका,असासवालकेलाजातआहे.

हेही वाचा

धार्मिक पर्यटनामध्ये कोपरगावला प्राधान्य द्यावे : आ. आशुतोष काळे

दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार : दूधउत्पादनकांचा इशारा

गडचिरोली: पिकांची राखण जीवावर बेतली, रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार

Back to top button