भारत विकास यात्रेद्वारे योजना लोकांपर्यंत..! : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

भारत विकास यात्रेद्वारे योजना लोकांपर्यंत..! : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत विकास यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लोकांपर्यंत पोहचण्याची मोठी संधी ग्रामपंचायत सदस्यांना आहे. विकासासाठी निधीची कमतरता नाही, फक्त काम करण्याची ईच्छाशक्ती ठेवावी, असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले. फत्याबाद येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा मंत्री विखे पा. यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पठारे, इंद्रभान थोरात, नानासाहेब शिंदे, शरद नवले, अभिजीत खंडागळे, सरपंच ज्ञानेश्वरी आठरे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मंत्री विखे पा. म्हणाले, पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. गावाच्या विकासाचे निर्णय करण्यासाठी मोठ्या संधी आहेत. कारण लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी लोकांसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून शंभरहून अधिक योजना सुरू आहेत. या योजना लोकांपर्यत घेवून जाण्याची जबाबदारी गावाचे कारभारी म्हणून नविन सदस्यांनी पूर्ण करावी, असे आवाहन करून मंत्री विखे पा. म्हणाले, समाजातील शेवटचा घटक विकास प्रकरीयेत यावा हाच प्रत्येक योजनेचा उद्देश आहे. सलग 80 टक्के लोकांना 2029 पर्यंत मोफत धान्य देण्याच्या योजना असेल किंवा आता आयुष्यमान भारत योजनेची सुरू झालेली कार्यवाही महत्वपूर्ण असल्याचे मंत्री विखे म्हणाले.

राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करून, संकटाच्या काळात शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शेतशिवार पानंद रस्त्याच्या कामांना प्रशासनाने अधिक गती देण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले. निवडणूक आता झाली आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, या विकासाला निश्चित सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पठारे व इंद्रभान थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.

दूध उत्पादकांना न्याय न्याय देण्याची भूमिका
दूध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. दरवाढ कशी करता येईल, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून सोमवारच्या बैठकीत त्यादृष्टीने निश्चीत निर्णय होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Back to top button