नगर : निळवंडेतून अतिरिक्त 1.5 टीएमसी पाणी

नगर : निळवंडेतून अतिरिक्त 1.5 टीएमसी पाणी
Published on
Updated on

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व गावांमधील पाझर तलाव भरुन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या सततचा पाठपुरावा व अविरत प्रयत्नांना अखेर यश मिळाले. दरम्यान, लाभ क्षेत्रात सर्व गावांतील पाझर तलाव भरण्यासाठी अतिरिक्त 1.5 टीएमसी पाणी देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली. निळवंडे कालव्यांची चाचणी पूर्ण झाल्यामुळे कधी आपल्या गावात पाणी येते. यासाठी लाभधारक क्षेत्रात शेतकरी व नागरिक निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसले होते. याची जाणीव असलेले आ. काळे यांनी निळवंडे डाव्या कालव्याच्या अधिकार्‍यांच्या वारंवार बैठका घेवून लवकरात- लवकर डाव्या कालव्याचे पाणी लाभक्षेत्रात कसे पोहोचेल, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या जिरायती गावांतील नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद फुलविण्यासाठी बुजविलेले ओढे, नाले आ. काळे यांच्या सहकार्याने उकरण्यात आले. सिमेंट पाईप देखील उपलब्ध करून देण्यात आले.

संबंधित बातम्या :

नुकत्याच झालेल्या 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी निकाल काय लागेल, याची पर्वा न करता आ. काळे निळवंडे कालव्याचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावरून त्यांना जिरायती गावातील नागरिकांना पाणी मिळवून देण्याची तळमळ दिसते. गुरुवार (दि.16) रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी लाभक्षेत्रात असंख्य शेतकर्‍यांना समवेत घेवून आ. काळे यावेळी हजर होते. आ. काळे यांच्या मागणीनुसार निळवंडे डाव्या कालव्याला अतिरिक्त 1.5 टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली. कोपरगाव मतदारसंघात निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात सर्व गावांतील पाझर तलाव भरुन दिले जाणार आहेत. अनेक वर्षांपासून चातकासारखी निळवंडेच्या पाण्याची वाट पाहणार्‍या या गावातील नागरिकांनी आ. काळे यांचे आभार मानले. यावेळी निळवंडे डावा कालव्याचे कार्य. अभियंता कैलास ठाकरे, कार्य. अभियंता श्रीमती सहाणे, उप कार्य. अभियंता विवेक लव्हाट व शेतकरी उपस्थित होते.

जिरायती गावांना होणार पाण्याचा लाभ..!
या पाण्याचा फायदा काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news