Nagar News : कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका | पुढारी

Nagar News : कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका

नगर; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने झेंडीगेट परिसरात सापळा लावून कत्तलीसाठी तीन वाहनातून आणलेली 19 गोवंशीय जनावरांची सुटका केली. तीन वाहने ताब्यात घेऊन सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन वाहनांसह 15 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. असद गफूर शेख (वय 36, रा. वाळकी, ता. जि. नगर, मजर महंमद हनिफ कुरेशी (वय 36), सिध्दीक असिफ कुरेशी (वय 22), शहाजान अब्दुल कलीम कुरेशी, आयनुर रफिक कुरेशी (सर्व रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, नगर), नासिर बाबू कुरेशी (वय 45, रा. कसाई गल्ली, आंबेडकर चौक, नगर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. या मुश्ताक हाजी इब्राहिम कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला झेंडीगेट) याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली, राज्यात गोवंश हत्याबंदी असताना झेंडीगेट परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन तीन वाहने आली आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा लावून पथकाने व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट येथून एक पिकअप, दोन टेम्पोमधून कत्तलीसाठी जनावरे आणल्याचे दिसून आले. त्या वाहनांतील 19 जनावरांची सुटका करून वाहनातील सहा जणांना ताब्यात घेतले.

आरोपींच्या ताब्यातून 2 लाख पंचवीस हजारांचे 19 गोवंशीय जनावरे, 13 लाख 50 हजारांची वाहने असा 15 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपीमधील काही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध तोफखाना, कोतवाली, आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलिस कर्मचारी सचिन आडबल, संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजित जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

Nagar News : नगरचा मल्ल महाराष्ट्र केसरी होईल : आमदार जगताप

Pimpri news : पिंपरी शहरात डेंग्यूचा डंख कायम

नाशिक : जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. ढिकले यांच्या देवळा येथील पतसंस्थांना भेटी

Back to top button