नगर जिल्ह्यात सरपंचपदाचे 68 उमेदवार झुंजणार !

नगर जिल्ह्यात सरपंचपदाचे 68 उमेदवार झुंजणार !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरत असलेल्या राहुरी तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेला राजकीय लढा चांगलाच चर्चेचा ठरत आहे. गाव पुढार्‍यांच्या विनवणीला मान देत सरपंचपदासाठी इच्छूक असलेले 93 जणांनी तर सदस्य पदासाठी इच्छूक असलेल्या 373 जणांनी माघार घेतली. 21 ग्रामपंचायतीसाठी 68 उमेदवार लोकनियुक्त सरपंच होण्यासाठी लढा देणार आहेत. तर सदस्यपदासाठी 528 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. 1 सरपंच तर 30 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. राहुरी तालुक्यामध्ये कानडगाव ग्रामपचांयतीमध्ये दुरंगी लढत आहे. 2 लोकनियुक्त सरपंचपदासाठी उमेदवार आहे तर 22 जण सदस्यपदासाठी एकमेकांना लढा देणार आहेत.

संबंधित बातम्या :

चिंचोली ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढत आहे. तीन सरपंच तर 28 इच्छूक सदस्यपदासाठी उभे आहेत. 1 सदस्यपद बिनविरोध निवड झाली आहे. यासह पिंप्री वळण ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासह सर्व सदस्यपद पूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहे. निंभेरे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी चौरंगी लढत होत आहे. तर सदस्यपदासाठी 23 उमेदवार उभे आहेत. सडे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी तिरंगी लढत असून सदस्यपदासाठी 35 उमेदवार एकमेकांना भिडणार आहे. डिग्रस ग्रामपंचायतीमध्ये मतदारांना सुगीचे दिवस असून सरपंचद पदासाठी 5 उमेदवार तर सदस्यपदासाठी तब्बल 80 उमेदवार रिंगणात उतरलेले आहे.

घोरपडवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी चौरंगी लढत असून 24 उमेदवार सदस्यपदासाठी उभे आहेत. एक उमेदवाराला सदस्य म्हणून बिनविरोध लॉटरी मिळाली आहे. मोमीन आखाडा ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत होत असून 21 सदस्य पदासाठी लढा देत आहेत. एक जागा बिनविरोध झाली आहे. दरडगावथडी सरपंचदासाठी दुरंगी लढत असून सदस्यपदासाठी 21 उमदेवार रिंगणात आहेत. धामोरी बु. ग्रामपंचायतीमध्ये चौरंगी तर सदस्यपदासाठी 18 उमेदवार उभे आहेत. 1 जागा बिनविरोध झाली आहे. धामोरी खुर्द ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी दुरंगी लढत असून सदस्यपदासाठी 18 उमेदवार रिंगणात आहे. 1 सदस्यपदाची जागा बिनविरोध झाली आहे. म्हैसगाव येथेही सरपंचपदासाठी चौरंगी लढत होत असून सदस्यपदासाठी 26 उमेदवार लढणार आहेत. देसवंडी येथे सरपंचपदासाठी चौरंगी लढत असून सदस्यपदासाठी 23 उमेदवार भिडणार आहेत. तमनर आखाडा येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत असून सदस्य होण्यासाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. गंगापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी तिरंगी लढत असून सदस्यपदासाठी 15 जण लढा देत आहेत. एक जण बिनविरोध सदस्य म्हणून घोषित झाला आहे.

सर्वाधिक लक्षवेधी ठरत असलेल्या बारागाव नांदूर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटा विरोधात भाजप अशी लढत आहे. वंचित बहुजन आघाडीने पॅनल उभारणीचा प्रयत्न करीत प्रतिष्ठितांना शह देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बारागाव नांदूर ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच होण्यासाठी 6 जण रिंगणात असून 60 उमेदवार सदस्य होण्यासाठी लढत देणार आहेत. ब्राम्हणी ग्रामपंचायतीमध्येही लोकनियुक्त सरपंच होण्यासाठी 4 उमेदवार असून सदस्यपदासाठी 42 जण लढा देणार आहेत. माहेगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी दुरंगी लढत असून सदस्य होण्यासाठी 19 उमेदवार मैदानात आहेत. 1 जागा बिनविरोधात झाली आहे. मालुंजे खुर्द येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत तर सदस्य होण्यासाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. मुसळवाडी ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत असून सदस्यपदासाठी 18 उमेदवार भिडणार आहे. सदस्यपदाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

टाकळीमिया ग्रामपंचायतीमध्ये 5 जण लोकनियुक्त सदस्य होण्यासाठी सरसावले आहेत. तर सदस्य होण्यासाठी 41 जण लढणार आहेत. शिलेगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद मिळविण्यासाठी दुरंगी लढत होत असून 13 जण सदस्य होण्यासाठी तयार आहेत. येथे 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पोटनिवडणुकीमध्ये राहुरी खुर्द, पाथरे खुर्द, गुंजाळे येथील प्रत्येक एका जागेसाठी बिनविरोध निवड करण्यात गाव पुढार्‍यांना यश आले आहे. संबंधित गावामध्ये तिन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news