इंदुरीकर महाराज हाजीर हो ! मिळाले न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

इंदुरीकर महाराज हाजीर हो ! मिळाले न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायालयात इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात खटला पुढे चालू राहणार असून इंदुरीकर महाराजांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराजांनी वकीलामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यात इंदोरीकर महाराज यांच्या बाजूने निकाल देण्यात आला होता. यानंतर अ‍ॅड. गवांदे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात गवांदे यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. त्यानंतर इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. येथे औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळण्यात आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news