अहमदनगर मर्चन्ट बँकेच्या 17 जागांसाठी 65 अर्ज

अहमदनगर मर्चन्ट बँकेच्या 17 जागांसाठी 65 अर्ज
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहरातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या 17 जागांसाठी मंगळवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर 65 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्जाची छाननी होणार असून, 2 ते 16 फेब्रुवारीदरम्यान अर्ज माघारीची मुदत आहे. सहकारी संस्था, बँका, पतपेढ्या यांच्या निवडणुका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या 13 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या निवडणुका घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार नगर शहरासह जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या अहमदनगर मर्चन्टस को-ऑप. बँक. लि. या बँकेची निवडणूक जाहीर झाली.

जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 24 ते 31 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करणची मुदत होती. आज अखेर 17 जागांसाठी 65 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या 1 फेबु्रवारीला अर्जाची छाननी होणार असून 2 फेब्रुवारीला वैध अर्जाची यादी नोटीस बोर्डावर प्रसिद्धी करण्यात येणार आहे. 2 ते 16 फेब्रवारी रोजी दुपारीपर्यंत अर्ज माघार घेण्यास मुभा असेल. 17 फेब्रुवारीला चिन्हाचे वाटप होणार असून, 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

16 विद्यमानांना पुन्हा संधी; बिनविरोधाच्या वाटेवर!
सत्ताधारी मंडळात किशोर मुनोत यांना संधी या नव्या चेहर्‍यास मर्चंट बँकेत संधी मिळाली आहे. आदेश चंगेडिया यांना थांबवत किशोर मुनोत यांना त्यांच्या जागी उमेदवारी मिळाली. बँकेच्या सत्ताधारी मंडळाने 16 विद्यमान संचालकांनाच पुन्हा निवडणुकीत उतरवित विश्वास दाखविला. 3/4 उमेदवारी अर्ज सोडले तर बाकीचे अर्ज हे सत्ताधारी मंडळाशीच निगडत आहेत. त्यामुळे बँक निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news