

नगर; पुढारी वृत्तसेवा : दहा दिवस आबालवृद्धांना आनंदाचे डोही बुडवून लाडके गणराय उद्या (गुरुवारी) सर्वांचा निरोप घेत आहे. त्यासाठी सर्व सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, प्रशासकीय तयारीही पूर्ण झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर, दोन गटांच्या मंडळांचा मिरवणुकीतील क्रमवारीवरून झालेला वाद लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा त्यावर तोडगा काढला आहे. यंदा मानाच्या गणेश मंडळांच्या नंतर येणार्या क्रमवारीत शिवसेनेचा ठाकरे गट आणि त्यामागे शिवसेना शिंदे गटाचे मंडळ सहभागी होणार आहे.
विसर्जन मिरवणुकीत डाळमंडई येथून मानाच्या 12 मंडळांच्या मागे शिवसेनेसह इतर मंडळे सहभागी होण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गट आणि ठाकरे गट यांच्यात 'पुढे कोण' यावरून नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीत वाद झाला होता. तो मिटविण्यात प्रशासनाची मोठी ऊर्जी खर्च झाली होती.
यंदा तसा वाद उद्भवू नये याची काळजी जिल्हा प्रशासनाने आधीच घेतली आहे. त्यानुसार मानाच्या गणेश मंडळांमागे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मंडळ आधी आणि त्यामागे शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंडळ असेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मिरवणूक कापड बाजार ते नेता सुभाष चौक या दरम्यानच रेंगाळत असल्याचा इतिहास आहे. यंदा तेही होऊ न देण्याचे आणि मिरवणूक वेळेत पुढे काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर असेल.
1. विशाल गणपती – माळीवाडा 2. संगम तरुण मंडळ – वसंत टॉकीज 3. माळीवाडा तरुण मंडळ – माळीवाडा वेस 4. आदिनाथ तरुण मंडळ – फुलसौंदर चौक 5. दोस्ती तरुण मंडळ – शेरकर गल्ली 6. नवजवान तरुण मंडळ – फुलसौंदर चौक 7. महालक्ष्मी तरुण मंडळ – माळीवाडा 8. कपिलेश्वर तरुण मंडळ – माळीवाडा 9. नवरत्न तरुण मंडळ – कवडे गल्ली 10. समझोता तरुण मंडळ – कानडे गल्ली 11. नीलकमल तरुण मंडळ – ब्राह्मण गल्ली 12. शिवशंकर तरुण मंडळ – पंचपिर चावडी 13. आनंद तरुण मंडळ – आझाद चौक 14. शिवसेना ठाकरे गट – शिवसेना शहर 15. शिवसेना शिंदे गट – मंगलगेट 16. दोस्ती मित्र मंडळ – बारातोटी कारंजा
माळीवाडा वेस, वसंत टॉकीज, धरती चौक, रामचंद्र खुंट, आडतेबाजार, डाळमंडई, तेलीखुंट, भिंगारवाला चौक, अर्बन बँक रोड, नवीपेठ, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, नेप्ती नाका, बाळाजीबुआ विहीर.
सावेडीतील मार्ग
टीव्ही सेंटर, प्रोफेसर कॉलनी चौक, कुष्ठधाम रस्ता, श्रमिकनगर, भिस्तबाग चौक, पाइपलाइन रस्ता, यशोदानगर विहीर.
पारंपरिक विहीर-बाळाजीबुवा विहीर, कल्याण रोड, यशोदानगर विहीर, सावेडी, साईनगर भोसले आखाडा, कृत्रिम कुंड-गांधीनगर रोड बोल्हेगाव, निर्मलनगर, गंगा उद्यान, आयुर्वेद उद्यान, केडगाव देवी रोड, भूषणनगर-केडगाव, भवानीनगर-जिजामाता चौक, शिवनेरी चौक स्टेशन रोड, गोंविदपुरा, भिस्तबाग महाल, गांधी मैदान, बाजार समिती चौक, दाणेडबरा, मोतीनगर, यशोदानगर पाईपलाईन रस्ता
हेही वाचा