कर्जत तालुक्यात 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा

कर्जत तालुक्यात 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अत्यल्प पावसामुळे खरीप पिके वाया गेली असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चाने 35 हून अधिक टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. सरकारतर्फे कर्जत-जामखेड मतदारसंघात 13 गावांना टँकर सुरू करण्याचे आदेेश निघाले असताना प्रत्यक्षात तीन गावांतच टँकर पाहायला मिळत आहेत. अस्वच्छ पाणी मिळत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आमदार पवार यांनी सुरू केलेल्या खासगी टँकरचा मोठा आधार नागरिकांना मिळत आहे.

आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून नुकतेच नागरिकांसाठी मोफत टँकर सुरू केले आहेत.
तालुक्यातील चिंचोली काळदाते येथे नवीन सहा टँकरचा प्रारंभ आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते, दीपक शिंदे, बापूसाहेब काळदाते, मोहन गोडसे, बाळासाहेब सपकाळ, राहुल नवले उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

कर्जत जामखेड मतदारसंघात पाण्याचे टँकर व चारा छावण्या सुरू व्हाव्यात, यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. खासगी टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

                                                              – आमदार रोहित पवार 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news