

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : इंडिया आणि भारत या दोन्ही शब्दांबद्दल आम्हाला अभिमान प्रेम आपुलकी आणि श्रद्धा आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत इंडिया या नावाने आघाडी तयार केली आहे. मात्र केंद्रातील भाजप सरकारने त्याचे नाव इंडियाऐवजी भारत केले. त्यांना इंडिया शब्दाचा एवढा धसका का घेतला आहे हेच कळत नाही. आगामी निवडणुकीत आपली सत्ता जाणार या भीतीने भाजपाने सरकार वाच विण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. यावरून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात काढलेल्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झालं. त्या वर्षपूर्तीनिमित्त यशोधन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार थोरात म्हणाले की आपण आत्तापर्यंत अनेक दुष्काळ हाता ळलेले आहे. परंतु इतका भीषण दुष्काळ आतापर्यंत कधीच पडला नव्हता. तो या वर्षी पडलेला आहे. खरिपाची पिके वाया गेल्यात जमा झालेली आहे. आता पाऊस पडला तरी ती पिके पुन्हा येऊ शकणार नाही. तसेच जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात सद्यस्थितीला निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार व्हावे तसेच दुष्काळा बाबत उपाय योजना करण्यासाठी वेळो वेळी बैठका घेणे गरजेचे आहे. मात्र संपूर्ण राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. आपणा सर्वांना आता मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी शासनाने आता गंभीर होणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील महायुतीचे सरकार दुष्काळाबाबतच गंभीर नसल्याची टीका आ थोरात यांनी केली.
मराठा समाज हा संयमी समाज आहे. या सरकारमधील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यांचा एवढा मोठा ताफा असूनही मात्र गेली वर्षभरात या सरकारचे मराठा समाजाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी वर्षभर साधी एकही बैठक घेतली नाही किंवा त्या प्रश्नावर कुठलीही चर्चा न करता फक्त मराठा समाजाचीअवहेलना केली. ही खूप वाईट गोष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता ५०%च्यावर असलेले आरक्षण मराठा समाजाला देण्यास काही हरकत नाही. आमची इथून मागे ही तीच मागणी होती, इथून पुढे राहणार आहे. महाविकास आघाडीचे नेत्यांचा मराठा आरक्षणाला पूर्ण पणे पाठिंबा आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे खतपाणी या मागणीला घालत नाही. मात्र सध्याच्या महायुती सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नातून काहीतरी वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.
जालना येथे मराठा समाज बांधव शांततेत आंदोलन करत होते. तुम्ही कोणतेही आंदोलन करा ते आम्ही मोडून काढू अशी रणनीतीसध्या च्या भाजप सरकारची आहे. आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज हा निषेधार्य आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासंदर्भात वर्षभर बैठका घेतल्या. मात्र सध्याच्या महायुतीच्या सरकारने वर्षभर कुठलीच बैठक घेतली नाही. त्यामुळे त्यांनीच श्वेतपत्रिका काढावी अशी टीका त्यांनी केली.
'शासन आपल्या दारी' या उपक्रमासाठी राज्य सरकारने कोट्यावधी रुपये खर्च केले आहे. जर जनतेला मदत करायची होती तर शासकीय यंत्रणेमार्फत जनतेला घरपोच दाखले देऊन केले असते. परंतु आपली राजकीय भाषणे ऐकण्यासाठी गर्दी होत नाही यासाठी आपली राजकीय भाषणे भाषण ऐकण्यासाठी गर्दी व्हावी म्हणून गाड्या पाठवून जनतेला बोलविले गेले आहे. या उपक्रमासाठी राज्यसरकारने केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची चौकशी होणे गरजेचे आहे.
सध्या केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाहीची गळचेपी तसेच राज्यघटनेची मोडतोड करण्याचे काम सुरू आहे. त्यावर आवाज उठवण्यासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी साडेतीन हजार की मीटर रची काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती. यात्रेमध्ये देशातील वाढती बेरोजगारी महागाई या विषयावर चर्चा करण्यात आली. या पदयात्रेला संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे नियोजन सर्वात चांगले झाले. विदर्भातील शेगावची सभेची देशात चर्चा झाली. देशातील सर्वसामान्य आणि मध्यम वर्गीयांचे जीवन महागाईने कठीण बनले आहे. जनतेला जागृत करण्यासाठी या पदयाचे काम केले. असल्याचा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
राज्यात सध्याच्या सरकारने राबविलेल्या वाळू धोरणाचे काय झाले हे आपणा सर्वांना माहित आहे. आता त्यांनी अ नगर आणि शिर्डी येथे औद्योगिक वसाहत सुरू करण्याची घोषणा आगामी होणाऱ्या निव डणुका डोळ्यासमोर ठेवून केली आहे. त्यांनी केलेली घोषणा कधीच पूर्णत्वास जाणार नाही. अशी टीका काँग्रेस नेते आ बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केली.