अहमदनगरचा हर्ष कटारिया, विधी सैनी पूर्व उपांत्य फेरीत; राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा

अहमदनगरचा हर्ष कटारिया, विधी सैनी पूर्व उपांत्य फेरीत; राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नगरकरांसाठी महत्त्वाचा ठरला नगरचे हर्ष कटारिया आणि विधी सैनी स्पर्धेच्या पूर्व उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, पदकाच्या एक पाऊलच दूर असल्याने बॅडमिंटनप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकेरी 17 वर्षे गटात नगरच्या हर्ष कटारियाने पुण्याच्या ओजस जोशीचा 15-11, 15-13 अशा सरळ सेटमध्ये परावभ करत स्पर्धेच्या पूर्व उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. त्याच्या पाठोपाठ ऐतिहासिक खेळी करणारी नगरची विधी सैनीनेही पूर्व उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने नगरच्या या दोन्ही बॅडमिंटपटूंकडून पदाकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तसेच, 17 वर्षेगटाच्या दुहेरीतही नगरच्या हर्ष कटारिया व तनय मेहेंदळे या जोडीने आदित्य पाटील आणि चैतन्य पाटणेकर (पुणे) यांचा 15-5, 15-8 अशा फरकाने पराभव करत दुहेरीतही आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. मुलींमध्ये 15 वर्षे गटात नगरच्या विधी सैनीने तपस्या चव्हाणचा 15-5,15-5 अशा सरळ सेटमध्ये पवराकत पुढच्या फेरीत प्रवेश केला. दुपारनंतर विधीची लढत सारा साळुंके हिच्याबारोबर झाली. या लढतीत विधी सैनीने पहिला सेट 17-19 अशा फरकाने गमविल्यानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या निर्णायक सेटमध्ये अनुक्रमे 15-12 व 15-10 अशा फरकाने पराभव करत एकतरफी विजय मिळवत पूर्व उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्याचा दिवस नगरच्या या दोन्ही बॅटमिंटनपटूंसाठी महत्त्वाचा ठणरा आहे.

साखळीतील एकेरीचा निकाल

दितिशा सोमकुवर विवि अनुश्री वैरागडे (15-10,15-17,15-10), परिधी बुधवार विवि गार्गी दाभोलकर (12-15,15-13,5-15), फिझा अकबानी विवि सफा शेख (15-9,8-15,13-15), धुन संघवी विवि रिद्धिमा मराठे (15-11,9-15,11-15), शरयू रांजणे विवि हार्दिक शिंदे (21-19,7-15,12-15), राघवेंद्र यादव विवि दिव्यांश खेमरिया (15-13,7-15,7-15), प्रसन्ना मन्ना विवि अर्जुन खांडेकर (15-6,9-15, 11-15), यशराज कदम विवि मल्हार घाडी (10-15,15-10,15-11), ओजस जोशी विवि अमेय जोशी (11-15,15-6,16-14), यशस्वी पटेल विवि मानसीता महापात्रा (8-15,15-12,15-11), रिया विन्हेरकर विवि नेव्या रांका (15-8,9-15, 15-7), जुई जाधव विवि धुन संघवी (9-15,15-12,11-15),

सामने पहाण्यासाठी नगरकरांची गर्दी

अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, योनेक्स सनराईज व स्व. शांतीकुमारजी फिरोदिया मेमो. राज्यस्तरीय 15 व 17 वर्षाखालील आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा वाडिया पार्कच्या बॅडमिंटन हॉलमध्ये चांगलीच रंगली असून, ही स्पर्धा पाहण्यासाठी गर्दीही वाढू लागली आहे. नगरच्या बॅडमिंटनपटूंनी नगरकरांच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्याने गर्दीही वाढू लागली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news