राहुरी : अकरा जणांकडून तरुणास दांड्याने जबर मारहाण

file photo
file photo

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : 'शेतात रोटा का मारला', असे विचारल्याचा राग आल्याने 11 जणांनी सुनील शिंगाडे या तरूणाला लाथा- बुक्क्यांसह दांड्याने मारहाण केली. ही घटना तालुक्यातील कणगर येथे (दि. 21 ऑगस्ट) रोजी घडली. सुनील शिंगाडे (वय 28 वर्षे) हा तरूण कणगर येथे राहतो. कणगर गावात वडाचे लवण शिवारात त्याची शेती आहे. शेजारी सुभेदार बाबुलाल शेख (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) याची जमीन आहे.

(दि. 21 ऑगस्ट) रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास सुनील शिंगाडे त्याच्या शेतात गेला. तेव्हा शब्बीर शेख हा शिंगाडे याच्या शेतात ट्रॅक्टरने रोटा मारत होता. सुनील शिंगाडे त्याला म्हणाला, 'माझ्या शेतात रोटा का मारतो,' असे विचारल्याचा त्याला राग आल्याने त्याच्यासह इतरांनी सुनिल शिंगाडे यास दांडक्याने मारहाण केली. शिंगाडे यांच्या फिर्यादीनंतर शब्बीर बाबुलाल शेख, राजु बाबुलाल शेख, सुभेदार बाबुलाल शेख, राजु शेख, दोन मुले, शब्बीरचा मुलगा व अन्य 4 ते 5 अशा 11 जणांवर गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news