कोपरगाव शहर विकासासाठी 10 कोटी निधी मंजूर : आमदार काळे | पुढारी

कोपरगाव शहर विकासासाठी 10 कोटी निधी मंजूर : आमदार काळे

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी वैशिष्टेपूर्ण योजने अंतर्गत 10 कोटी निधी मंजूर करण्यात यश मिळविले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास होवून शहरातील नागरिकांच्या मुलभूत विकासाच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी आ. काळे यांनी दिलेले वचन पूर्ण करताना कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल 131.24 कोटी देऊन शहर विकासाला देखील आजपर्यंत 35 कोटींचा निधी देवून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे.

विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव शहराची धुळगाव अशी ओळख पडली होती. त्याचा परिणाम स्थानिक बाजेपेठेवर होवून व्यवसाय मंदावले होते. एकीकडे रस्त्यांची दुर्दशा तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न. अशा परिस्थितीत पाणी प्रश्न सोडविण्याबरोबरच कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे जनतेला दाखविलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ. काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला चालना देवून कोटीच्या कोटी विकास निधी आणला आहे.

कोपरगाव शहरातील रस्ते चकाचक व्हावेत, भूमिगत गटारी व छोट्या मोठ्या पुलांचा विकास होवून नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात. कोपरगाव शहराची बाजारपेठ पुन्हा फुलावी व कोपरगाव शहराचे सौंदर्य पुन्हा खुलावे हे स्वप्न उराशी बाळगून आ. काळे यांचा विकासकामांना निधी मिळविण्याचा धडाका सुरूच असून त्याच्या अथक प्रयत्नातून महायुती सरकारकडून 10 कोटी निधी मिळवीण्यात काळे यशस्वी झाले आहेत.

या 10 कोटी निधीतून कोपरगाव शहरातील व्यापारी संकुल, विविध रस्ते, समाज मंदिर, समाजिक सभागृह, शहर सुशोभिकरण तसेच हद्दवाढ झालेल्या भागाचा देखील विकास कामे होणार आहेत. यामध्ये कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील रस्ते, समाज मंदिर बांधणे आदी कामांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

आ. काळेंचे मानले आभार

कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील प्रलंबित विकास कामांना आ. आशुतोष काळे यांनी निधी देवून नागरिकांच्या अडचणी सोडविल्या बद्दल वडार समाज, भावसार समाज, मुस्लीम समाज, गुजराथी समाज तसेच बौद्ध समाजाच्या नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

हेही वाचा

नाशिक : सिडकोतील बेवारस चांदीचा उलगडा

संगमनेर : आगामी निवडणुकांसाठी कामाला लागावे : खा. सदाशिव लोखंडें

नाशिक : जिल्हा बॅंकेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

Back to top button