कोपरगाव कारागृहाचे रूपडे पालटणार | पुढारी

कोपरगाव कारागृहाचे रूपडे पालटणार

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तहसील कार्यालयातील 70 ते 75 वर्ष जुन्या झालेल्या दुय्यम कारागृहाच्या डागडूजीचे काम आठवडाभरात सुरू होणार असल्याने येथील 77 आरोपी औरंगाबाद हरसुल कारागृह तसेच नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहेत. दुय्यम कारागृहाची पंधरा ते वीस लाख रुपये खर्चून डागडुगीचे काम तीन महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूर्ण केले जाणार आहे.

तहसील कार्यालयाच्या इमारती लगतच दुय्यम कारागृह आहे. ती इमारत खूप जुनी असूद तीन ते चार वेळेस कैद्यांनी भिंती कोरून पलायन केले होते, तर काहींनी तसा प्रयत्न केला. त्यामुळे मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. प्रभारी तुरुंग निरीक्षक चंद्रशेखर कुलथे यांनी 15 जुलै रोजी कारागृह उपमहानिरीक्षक पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करून 77 कैदी हलवण्याबाबत कळवले होते, त्यानुसार 14 तारखेस कैदी हलवण्याबाबत रीतसर परवानगी दिली. त्यानुसार 37 आरोपी हरसुल कारागृहात तर 40 कैदी नाशिक मध्यवर्ती कारागृहात बंदोबस्तात हलवण्यात आले आहेत. डागडुजी मुळे कारागृहाच रूप बदलण्यास मदत होणार आहे.

दुय्यम कारागृह दुरुस्तीत 35 द 10 मी. आकारातील जुने कौलारु छत काढून त्याठिकाणी लोखंडी पत्रे बसविणे, बरॅक क्र. 4 व 5 च्या मागील बाजूच्या जुन्या भिंती पाडून त्या ठिकाणी नवीन भिंतींचे बांधकाम करणे, बरॅक क्र. 1 ते 5 च्या जुने झालेले सर्व लोखंडी दरवाजे काढून त्याठिकाणी नवीन लोखंडी दरवाजे बसविणे. बरॅक क्र.1 ते 3 च्या मागील बाजूस संडास व बाथरुम करितां नवीन ड्रेनेज लाईन चेंबर नव्याने तयार करणे, पेवर ब्लॉक बसविणे. बरॅक क्र. 1 ते 5 तसेच स्टाफ रूम मधील जुने प्लास्टर काढून तेथे नव्याने प्लास्टर करणे.
इमारतीस रंगरंगोटी करणे. बरॅकींमधील बाथरुमकरिता नवीन पाईपलाईन करणे. कारागृहाचे परिसरांत एल आकाराचे लोखंडी बरगेटींग लोखंडी गेट तयार करणे. इतर अनुषंगिक बाबींची दुरुस्ती करणे यांचा समावेश आहे.

कारागृहांतून हलवण्यात आलेल्या कैद्यामध्ये गंभीर गुन्हयांतील खून, लव्ह जिहाद प्रकरण, दरोडा, रस्तालूट, शिर्डीतील ठेवीदारांची फसवणूक केलेले आरोपी, 420, बलात्कार, मुलींना फूस लावून पळवून नेणे, इ. गुन्हयातील कोपरगांव शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, शिर्डी पोलीस स्टेशन, राहाता पोलीस स्टेशन, लोणी पोलीस स्टेशन अशा एकूण 5 पोलीस स्टेशनचे कैदी होते. गुन्हयांतील 37 आरोपींची सेंट्रल जेल, हर्सल छ. संभाजीनगर येथे तर दि. 20 रोजी सेंट्रल जेल नाशिकरोड येथे अशा एकूण 77 आरोपींची रवानगी करण्यांत आली. याकामी पोलीस अधिक्षक राकेश ओला, उपविभागीय अधिकारी, शिर्डी विभाग संदीप मिटके, पो. निरीक्षक प्रदिप देशमुख व अधिकारी यांनी सहकार्य केल्यांची माहिती तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.

दोन मजली कारागृहाचा प्रस्ताव लालफितीत….

तहसील कार्यालया नजीक असलेले वर्षानुवर्ष जुने झालेले दुय्यम कारागृह मोडकळीस आले आहे, या कारागृहाची नूतनीकरण व्हावे, दोन मजली इमारत व्हावी म्हणून शासनाकडे येथील आजी-माजी लोकप्रतिनिधी यांची वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात आला, मात्र सत्ता बदलामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा लाल फितीत अडकला आहे.

हेही वाचा

सिंधुदुर्ग : पावशीत कार-मोटरसायकलचा अपघात, एक गंभीर

केसरी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

डॉ. दाभोळकर खुनाच्या तपासाबाबत सरकारची दिरंगाई’ : डॉ. हमीद दाभोळकर

Back to top button