अहमदनगर : दररोज 1500 युवक देतात तलाठी पदांची परीक्षा | पुढारी

अहमदनगर : दररोज 1500 युवक देतात तलाठी पदांची परीक्षा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात तलाठी पदाच्या 254 जागा रिक्त असून, या पदासाठी 61 हजार युवकांनी अर्ज दाखल केले आहेत. 17 ऑक्टोबरपासून या पदासाठी लेखी परीक्षा सुरु झाली आहे. जिल्ह्यातील सात केंद्रांवर दररोज जवळपास दीड हजार युवक ऑनलाईन परीक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम राबविले जातात. गावपातळीवर या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तलाठी भाऊसाहेबांवर असते.

राज्यभरात तलाठी पदांची संख्या कमी असल्यामुळे दोन- तीन गावांचा भार एका तलाठी भाऊसाहेबांना उचलावा लागत आहे. नगर जिल्ह्यात 202 नवीन सजा निर्माण करण्यात आल्यामुळे नवीन 202 तलाठी पदे निर्माण झाली आहेत. याशिवाय जिल्ह्यातील मंजूरपदांपैकी 52 पदे रिक्त आहेत. असे एकूण जिल्ह्यात 254 पदे रिक्त आहेत. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राज्यभरात 4 हजार 650 तलाठी पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यानुसार पुणे येथील टीसीएस कंपनीमार्फत गुरुवारपासून जिल्ह्यातील सात केंद्रावर परीक्षा सुरु झाली आहे.

हेही वाचा

लवंगी मिरची : तुफान कॉमेडी सर्कस!

अहमदनगर : अट्टल सायकल चोराला अटक; तब्बल 11 सायकली जप्त

दाभोलकरांच्या मोकाट मारेकर्‍यांना अटक करा ; अविनाश पाटील यांची मागणी

Back to top button