कर्जत तालुक्यात सव्वादोन लाखांचा मद्यसाठा जप्त; दोघांना अटक | पुढारी

कर्जत तालुक्यात सव्वादोन लाखांचा मद्यसाठा जप्त; दोघांना अटक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने कर्जत तालुक्यात (जि.अहमदनगर) दोन ठिकाणी छापे टाकून दोन लाख 36 हजार 845 रुपये किमतीचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. मिरजगाव व राशीन येथे ही कारवाई करून या पथकाने दोन जणांना अटक केली. संपत नरसैया बोंगोनी (रा.मिरजगाव), श्रीनिवास रंगय्या सुरगोनिवार (रा. राशीन) अशी आरोपींची नावे आहेत.

पथकाने बोंगोनी याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 76 हजार 925 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा मिळून आला. सुरगोनिवार याच्या घरातून एक लाख 59 हजार 920 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. पथकातील दुय्यम निरीक्षक वाय. व्ही. पाडळे, प्रकाश दाते, रितेश दांगट, सहायक दुय्यम निरीक्षक व्ही. एम. चिंदरकर, अविनाश जाधव, सोमनाथ पाटील, रवींद्र पाटील, नंद महाजन, दीपक कळंबे यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक वाय. व्ही. पाडळे करीत आहेत.

हेही वाचा

अहमदनगरमध्ये भीषण अपघात; दोन जागीच ठार

अहमदनगर : दक्षिणेतून थोरात; शहरातून काळेंची मागणी : माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे

ग्रामविकासातून सामर्थ्यशाली भारताची निर्मिती!

Back to top button