नगर : जाखुरी शिवरस्त्याचा श्वास मोकळा

नगर : जाखुरी शिवरस्त्याचा श्वास मोकळा
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षापासून जाखुरी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील अत्यंत अडचणीचा खराडी , जाखुरी, शिवरस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही अडचणीमुळे हे तीनही रस्ते मोकळा श्वास घेऊ शकत नव्हते. मात्र गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्ताने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर अधिकार्‍यांनी रस्त्यातील अडचणी दूर करत तब्बल 30 वर्षानंतर जाखोरी रस्ता खुला करण्यात महसूल प्रशासनाला यश आले.

संगमनेर तालुक्यातील जाखुरी आणि खराडी शिव, निमगाव टेंभीशिरापूर गावांना जोडणारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता. मागील तीस ते चाळीस वर्षापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. गावातून ग्रामस्थ, शेतकरी, शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना येण्या -जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे अतोनात हाल होत असे. या शिवरस्त्यावरील अतिक्रमण काढण्या बबात ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूल प्रशासनास निवेदन देवून मागणी केली होती.

ग्रामपंचायत स्तरावर हा शिवरस्ता खुला करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु गावपातळीवर अनेक अडचणी आल्या. रस्ता तयार करण्यात सुद्धा अनेक अडचणी आल्या, परंतु गगनगिरी महाराज यांचा सप्ताह येथे होणार असल्यांने हा रस्ता सप्ताह स्थळाकडे येण्यासाठी महत्त्वपूर्ण रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमण मुक्त होण्याचे साकडे जाखुरी ग्रामस्थांनी आणि सप्ताह कमिटीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना घातले . त्यानंतर महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांना हा रस्ता अतिक्रमण मुक्तकर कण्याबाबत सूचना दिल्या. ना विखे यांच्या सूचनेनंतर प्रांताधिकारी शैलेश शिंदे, तहसीलदार यांनी समक्ष भेट देत पाहणी केली. गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने या रस्त्यातील अडचणी दूर झाल्या अन 30 ते 40 वर्षापासून अतिक्रमणात सापडलेला शिवरस्ता मुक्त केला.

अनेक वर्षापासून अतिक्रमणात सापडलेला खराडी ते जाखुरी शिवरस्ता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर प्रशासनाच्या कार्यवाहीनंतर रस्ता खुला झाल्याने सर्व गावाचें दळणवळण सोयीस्कर होण्यात मदत झाली.
                                                    -नितीन पानसरे माजी सरपंच जाखुरी 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news