देशभरात वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचवा : शालिनीताई विखे पाटील | पुढारी

देशभरात वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचवा : शालिनीताई विखे पाटील

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी तुम्हा आम्हाला जे विचार दिलेले आहे. ते विचार सर्वांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. संतांनी दिलेल्या विचारांची किंमत पैशात कधीही मोजता येत नाहीत म्हणून संतांनी दिलेले वारकरी संप्रदायाचे सर्व विचार देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्या साठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे सुरू असणार्‍या स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात ऋषी संस्कृती बरोबर कृषी संस्कृतीचा मिलाप व्हावा, या उद्देशाने शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या गगनभरारी कृषी महोत्सवाचा शुभारंभ विखे पद्मश्री पोपटराव पवार, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, संजय महाराज देशमुख, वसंतराव देशमुख, आबासाहेब थोरात, बापूसाहेब देशमुख, कपिल पवार, सुदीप वाकळे, सुभाष राहणे, सागर वाकचौरे, ज्ञानेश्वर वाकचौरे, अक्षय भालेराव, विवेक कासार, किसनराव शिंदे, नानासाहेब कानवडे, माजी सरपंच बाळासाहेब देशमुख, नितीन पानसरे, माजी उपसरपंच किसन पानसरे, राजेंद्र पानसरे कारभारी राहणे यांच्यासह पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

विखे म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशातच सर्वात मोठा गंगागिरी महा राजांचा सप्ताह होत असतो. त्यापाठोपाठ आता गगनगिरी महाराजांचा सप्ताह होत आहे. या दोन्ही सप्ताहाना तेवढेच महत्त्व प्राप्त झालेले आहे. आमच्या सारख्या राज कारण्याची एखादी राजकीय सभा असली तर आम्हाला गाडी पाठवून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत नसतात . मात्र संतांच्या विचारात एवढी ताकद आहे की आपोआप त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोकांचे पाऊले सप्ताहांकडे वळत असतात. तुम्ही कितीही शिक्षण घेऊन मोठे झाले आणि उच्च पदाला गेले तरी संतांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपण तग धरू शकत नाही.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की शेतीमध्ये बेसुमार रासायनिक खताचा वापर केल्यामुळे मातीचे आरोग्य संपत चालले आहे. शेतीला रासायनिक खताचा बेसुमार वापर केला असल्यामुळे त्या शेतीतून उगवलेले अन्न धान्य सुद्धा विष रूपातच तयार असते. आपण सर्व जण अन्न धान्याच्या रूपाने विषच खात असतो. त्यामुळे मानवाला कॅन्सर सारखा रोग होऊ लागला आहे. म्हणून उद्याच्या भविष्यकाळात आपल्या सर्वांना काळ्या मातीकडे आणि पाण्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. गगनगिरी महाराजांच्या सप्ताहात गगनभरारी कृषी महोत्सव आयोजित केला आणि या कृषी महोत्सवामध्ये ऋषी व कृषी संस्कृतीचा मेळ घातला आहे.

पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या की, मी गावरान बियाणे जपले असून मी हळदी कुंकवाला महिलांकडे गेले तर वाण म्हणून गावरान बी भेट देत असते. नुसते फोटो काढून शो करण्या पेक्षा आपण आपल्या शेतीत बदल कर ण्याचा विचार करा जुने ते सोने आहे असे मानून जुन्याच स्वीकार करावा असे आवाहन करून शेतकर्‍यांनी आपल्या काळ्या मातीला जपत गावठी बियाणे जपा, असा सल्ला दिला.

वृक्षाचे संवर्धन करा : पवार
सप्ताह कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांना एक झाडाचे रोप भेट देणार आहे. त्यांचे तुम्ही फोटो काढून ठेवा, अन पुढील सप्ताहात तुम्हाला दिलेले झाड जगले की नाही? याचा जाब विचारा आणि प्रत्येक महिलेने आपल्या घरी शौचा लय असलेच पाहिजे नसेल तर मी प्रथम ते बांधील, अशी गगनगिरी महाराजांच्या चरणी शपथ घ्या असाही मोलाचा संदेश आदर्श हिवरेबाजार गावचे माजी सरपंच व आदर्श गाव योजनेचे माजी कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी जाखुरीकरांना दिला.

हेही वाचा :

कोरेगाव पार्क : आदिवासी संस्कृतीचा दुर्मीळ ठेवा

छत्रपती संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Back to top button