नगर : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर : कार्यकर्ते संतप्त | पुढारी

नगर : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर : कार्यकर्ते संतप्त

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो इडिट करून आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करण्यात येत आहे. (दि. 7 ऑगस्ट) रोजी येथील आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांना ही बाब दिसल्यामुळे तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्याची घटना समोर आली होती.

यानंतर डॉ. आंबेडकर यांचा अपमान केल्याचा प्रकार समोर आला. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर काही महिन्यांपासून डॉ. आंबेडकर यांचे फोटो इडिट करून, आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यांचा अवमान करण्याचा प्रकार सुरू आहे. ही बाब वंचितचे जिल्हा नेते निलेश जगधने यांच्या लक्षात आली. त्यांनी हा प्रकार इतर कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिला. या घटनेचा निषेध व्यक्त करीत वंचितचे जगधने, शहराध्यक्ष पिंटू साळवे, गणेश पवार, आदित्य साळवे, हरिदास जाधव, निवृत्ती जाधव आदींनी राहुरीचे पो. नि. धनंजय जाधव यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.

हेही वाचा :

नगर : गगनगिरी महाराज सप्ताहाचा संत मिरवणुकीने श्रीगणेशा

पुणे : दारू न पाजल्याने स्क्रूड्रायव्हर एकाच्या पोटात खुपसला

Back to top button