

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : गेल्या चाळीस वर्षांपासून माळी बाभूळगाव येथील वहिवाटीचा बंद रस्ता महसूलच्या पुढाकाराने खुला करण्यात आला. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. माळी बाभूळगाव हत्राळ-सैदापूर शिवरस्त्यावरील अतिक्रमण काढून वाहिवाटीकरिता खुला केला. प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार शाम वाडकर,पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षका मनीषा धिवर, मंडल अधिकारी रवींद्र शेकटकर, तलाठी पल्लवी तलवारे, सीताराम काळे, पोलिस हवालदार सुरेश बाबार, रामदास खैरे, संदीप मरकड आदींचे सहकार्य लाभले.
शिवरस्त्यावरून ये-जा करण्यासाठी बर्याच वर्षाचा त्रास होता.हा रस्ता अतिक्रमित झाला होता. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेर महसूल आणि पोलिसांनी रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता खुला केला. सध्या महसूल विभागाने गाव रस्ते, शिव रस्ते आणि पाणंद रस्ते मोकळे करून देण्यासाठी अभियान सुरू केले आहे. अतिक्रमणे हटवण्यास नकार देणार्यांना शिक्षेची तरतूद आहे. मुख्य रस्त्यापासून आत शेतामध्ये जायचे असल्यास रस्ता नसतो. त्यामुळे शेतात, वस्तीवर तसेच राहण्याच्या जागेवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या हाल होतात. पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नव्हता. शेतातून चिखल तुडवत जावे लागते. आता रस्ता होण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमणे काढून रस्ता खुला करून दिला आहे . आमचा मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. येण्या जाण्यासाठी या रस्त्याचा चांगला वापर होईल, असे स्थानिक शेतकरी संजय सानप, जयराम कोलते, राजू घोडके यांनी सांगितले.
माळी बाभूळगाव, हत्राळ-सैदापूर परिसरातील शेतकर्यांची अनेक वर्षापासूनची रस्त्याची मागणी होती दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून योग्य ती कार्यवाही करून हा रस्ता रहदारीसाठी खुला केला.
-शाम वाडकर, तहसीलदार, पाथर्डी
हेही वाचा :