माथाडी कामगार विधेयक चर्चेविना मंजूर करू नये : घुले | पुढारी

माथाडी कामगार विधेयक चर्चेविना मंजूर करू नये : घुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : माथाडी कायद्यातील तथाकथीत सुधारणा विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात येवू नये, या मागणीचे निवेदन राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबई येथे देण्यात आले. याप्रसंगी  कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार संग्राम जगताप, राज्य सहचिटणीस अविनाश घुले, माथाडी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र भोसले आदी उपस्थित होते.
अविनाश घुले म्हणाले, हे विधेयक मंजूर केल्यावर लाखो कामगार रस्त्यावर येतील जर कायद्यात बदल करावयाचा असेल तर सर्व कामगार संघटना यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात यावा.
राज्य कृती समितीशी चर्चा करण्यात यावी. नुकतेच मे महिन्यात माथाडी महामंडळाचे राज्य अधिवशेन नगरमध्ये पार पाडले. त्यामध्ये माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हा ठराव एकमताने संमत करण्यात आला होता. या सरकारने माथाडी कायदा कसा मजबूत करता येईल, यावर भर देण्यात यावा. आ. संग्राम जगताप म्हणाले, माथाडी कायद्याबाबत सरकाराने योग्य तो निर्णय घ्यावा, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. पूर्वीपासून हा कायदा अस्तित्वात असून, त्यांची अंमलबजावणी ही नगरपासून सुरू झाली आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, याबाबत संयुक्त चिकित्सा समिती स्थापन करण्यात येणार आहे ही समिती कामगार संघटनांशी चर्चा करूनही आपला अहवाल सादर करेल त्यानंतर विधेयकाबाबत निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा :

Back to top button