नगर : उंबरेनंतर वांबोरीत लव्ह जिहाद

नगर : उंबरेनंतर वांबोरीत लव्ह जिहाद

वांबोरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील उंबरे येथील धर्मांतरासह व लव्ह जिहादवरून तापलेले वातावरण थंडावण्याच्या आतच वांबोरीतही तसाच प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेहनवाज आसिफ शेख (रा. वांबोरी, ता.राहुरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो फिरून भाजीपाला-फळे विकत असल्याचे सूत्रांनही सांगितले. उंबरे येथे धर्मांतरासह व लव्ह जिहाद सारखी घटना उघडकीस आल्याने वातावरण संतप्त झाले. या घटनेला आठ दिवस उलटले नाही तोच तालुक्यातील वांबोरी येथेही तसाच प्रकार उघडखीस आला. 'तू माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा माझ्या मोबाईलमधील तुझे व अन्य चार-पाच मुलींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू' तसेच तुझ्यासह त्या मुलींची बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गावातीलच अल्पवयीन मुलीला धमकी देत आरोपीने भेटायला बोलावून तिचा विनयभंग केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राहुरी पोलिस ठाण्यात शहनवाज शेख याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. गत वर्षी दिवाळीच्या सुट्टीत अल्पवयीन मुलगी आठवडे बाजारात गेली असता आरोपीने तिच्याशी ओखळ वाढविली.मोबाईलमध्ये पतिचे फोटो काढले. 'तू मला भेटायला ये, अन्यथा तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील' अशी धमकी त्यावेळी दिल्याची चर्चा वांबोरी गावात सुरू आहे.

धमकीला घाबरून मुलगी त्याला भेटायला गेली. त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये आणखी चार-पाच मुलींचे फोटो तिला दिसले. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक करीत असल्याचे तिच्या निदर्शनास आल्याने गुरुवारी रात्री राहुरी पोलिस ठाण्यात शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार पोलिस गार्भीयाने घेणार का?
अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रकार उंबरे येथील घटनेनंतर वांबोरीतील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतरण करण्याचा हेतू असल्याचे समोर आले आहे. आणखी चार-पाच मुलींनाही प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतरण करण्याचा डाव रचला होता का? आणखी किती मुली आरोपीच्या संपर्कात आहेत ? हा सर्व प्रकार लव्ह जिहादच का? या प्रकाराकडे गांभीर्याने बघून पोलिस अशा प्र्रवृत्तीचा बंदोबस्त करणार का ? असे प्रश्न राहुरी तालुक्यातील प्रत्येकाच्या तोंडी उपस्थित केले जात आहेत.

राहुरीतील आयोजित सकल हिंदू समाज मोर्चाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या वांबोरी येथे घटनेमुळे वांबोरीत राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
                                                           – धनंजय जाधव, पोलिस निरीक्षक,
                                                   – चंद्रकांत बराटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news