भंंडारदरा ‘ओव्हर-फ्लो’च्या मार्गावर | पुढारी

भंंडारदरा ‘ओव्हर-फ्लो’च्या मार्गावर

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  उत्तर नगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचा साठा शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी 10 हजार 264 दशलक्ष घनफूट झाला. म्हणजेच धरण 93 टक्के भरले. या पातळीवरच साठा स्थिर ठेवून धरणातून 1915 क्युसेक आणि निळवंडे धरणातून 2400 क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली. धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे पाटबंधारे विभाग दोन दिवसांत जाहीर करण्याची शक्यता आहे.

पावसाचे आगर असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे महिनाभरापासूूनच पावसाचे प्रमाण कमी-अधिक आहे. धरणातून विद्युत निर्मितीसाठी 835 क्युसेकने, तर स्पिलवे गेेेटमधूून 1090 क्युसेकनेे पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पाण्याची आवक टिकून असल्याने 11039 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा साठा नियंत्रित ठेवत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता 10 हजार 264 दशलक्ष घनफुटांवर आणि पातळी 743.81 फुुटांवर स्थिर करण्यात आली. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल होऊन स्थिरावला. त्यामुळे धरण दोन दिवसात तात्रिकदृष्ट्या भरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने निळंवडे धरणाचा साठा 6811 दशलक्ष घनफुटांवर (81 टक्के) पोहोचला आहे. तेथूनही प्रवरा नदीत 2400 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

रंधा धबधबा अक्राळविक्राळ
भंंडारदरा धरणाच्या पाणलोटात हलक्या ते मध्यम सरी मात्र सतत कोसळत आहेत. घाटघर उंदचन प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणात पाणी भंडारदरा धरणात येत आहे. मान्हेरचा सीनापावली, केळुंगणचा प्रेमदरा, दरेेवाडीचा धामण्या ओहोळ, कातळापूरचा तेरुंगणमधील पिंपरचोडा आदी ओढ्या- नाले तुडुंब भरून वाहत असून, प्रवरेच्या पात्रात विलीन होत आहेत. त्यामुळे रंधा धबधबा अक्राळविक्राळ रूप घेऊन कोसळताना दिसत आहे. भंडारदर्‍याच्या पातळीवर धरणाचे शाखा अधिकारी अभिजित देशमुख, वसंत भालेराव, प्रकाश चव्हाण, मंगळीराम मधे, चंद्रकांत भगत, अत्तू संगभोर, प्रकाश उघडे व कर्मचारी चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.
भंडारदरा परिसरात शुक्रवारी सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये (कंसात एकूण पाऊस) ः घाटघर 75/3775, रतनवाडी 69/3707, पांजरे 67/2896, वाकी 46/1863, भंडारदरा 59/2428.

बारा वर्षांत भंडारदरा भरल्याचा इतिहास
भंडारदरा धरण गेल्या बारा वर्षांपासून (2010 ते 2023 पर्यंत) प्रत्येक वर्षी कधी भरले, याच्या तारखा धरण व्यवस्थापनाकडून प्राप्त झाल्या. त्या अशा ः 2011-14 ऑगस्ट, 2012-6 सप्टेबर, 2013-3 सप्टेबर, 2014-1 सप्टेबर, 2016-21 सप्टेबर, 2017-24 जुलै, 2018-12 ऑगस्ट, 2019-17 ऑगस्ट, 2020-26 ऑगस्ट, 2021-12 सप्टेबर, 2022-11 ऑगस्ट.

Back to top button