नगर : कोरोना काळात परवाना अन् लगेच दोन कोटींची ऑर्डर !

नगर : कोरोना काळात परवाना अन् लगेच दोन कोटींची ऑर्डर !
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोना कालावधीत आणि तेही ऑटोमोबाईल्स व्यवसायात असलेल्या कंपनीला थेट होलसेल औषध विक्रीचा परवाना दिला जातो आणि त्यानंतर लगेचच चार महिन्यांत दोन कोटींची ऑर्डरही मिळते, बिले वसईच्या फर्मच्या नावे, परवाना मात्र जळगावचा, अशी वेगवेगळी माहिती प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा. लि. या कंपनीच्या कागदपत्रांवरून पुढे आल्याने या खरेदीबाबत आता आणखी संशय वाढू लागल्याची चर्चा आहे. कोरोनाची चाहूल लागताच अनेकांनी ही संधी शोधून मोठ्या तत्परतेने अन्न व औषध प्रशासनाचा परवाना मिळविल्याचे पुढे येत आहे.

जिल्हा रुग्णालयाने दोन लाख कोविड अ‍ॅन्टीजन टेस्ट किटच्या खरेदीकरिता 'प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा.लि.' कंपनी, वसई यांच्या नावे दोन कोटी रुपये मोजले. याबाबत 'पुढारी'ने लक्ष वेधल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित कंपनीकडून खुलासा मागविला. संबंधित कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, सिव्हिलने दोन कोटी रुपये जमा केलेली प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा. लि. ही कंपनी बिलावरील पत्त्यावरून वसईची दिसत असली, तरी ती मूळ जळगावची आहे.

वसईतील 'ती' केवळ एक फर्म असल्याचे दाखविले गेले आहे. शिवाय जळगावमध्ये प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा.लि.च्या संचालकांनी 'ऑटोमोबाईल्स' व्यतिरिक्त 29 नोव्हेंबर 2020 रोजी अन्न व औषध प्रशासनाचा सी व सी 1 टाईपमधील होलसेल औषध व सौदर्यंप्रसाधाने विक्रीचा परवाना मिळविला आहे. विशेष म्हणजे हा परवाना मिळाल्यानंतर एप्रिल-मे 2021 मध्ये याच कंपनीला नगर जिल्हा रुग्णालयाने दोन कोटींचे रॅपिड चाचणी कीट पुरवठ्याचे आदेश काढल्याचे दिसून येते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news