नेवासा : शेतकर्यांचा पोटखराबा क्षेत्रदुरूस्तीचा प्रश्न मार्गी

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देडगाव येथील 188 शेतकर्यांचा पोटखराबा क्षेत्राचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. लवकरच या शेतकर्यांना त्याचे सातबारा उतारे मिळणार आहेत.
पोटखराबा क्षेत्रावर शेतकर्यांना कुठल्याही प्रकारचे कर्ज व शासकीय योजना अनुदान आदीं सवलती मिळत नव्हत्या. त्यामुळे जमीन असूनही शेतकर्यांची अडचण होत होती. शेतकर्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार गडाख यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करीत देडगाव येथील 188 शेतकर्यांचे पोटखराबा क्षेत्र दुरुस्तीचे काम मार्गी लावले आहे. लवकरच त्यांना पोटखराबा दुरुस्तीचे उतारे मिळणार आहेत. यामुळे देडगाव व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी आमदार गडाख यांचे आभार मानले.