

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथील सरपंच ज्योती घोरपडे यांच्यासह पती संतोष घोरपडे, सासरे, दीर घरातील लहान मुलांना लोखंडी दांडक्यासह कुर्हाडीने जबर मारहाण करणार्यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी कल्याण- निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथे वैजूबाभळगाव ग्रामस्थांनी अर्धा तास रास्तारोको आंदोलन केले. शनिवारी दुपारी राजकीय वैमन्यासातून सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब घोरपडे यांच्यासह इतर काही लोकांनी सरपंच ज्योती घोरपडे व कुटुंबातील इतर सहा-सात जणांना घरी जाऊन जबर मारहाण केली. मारहाण करणार्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून तडीपार करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनामध्ये वनिता घोरपडे, शकुंतला गुंजाळ, लता गुंजाळ, चंद्रभागा लोहकरे, दुर्गाबाई घोरपडे, अलका वांढेकर, पुष्पा लोहकरे, सुनीता घोरपडे, सुजाता गुंजाळ, नम्रता गुंजाळ, स्वाती लोहकरे, माजी सरपंच संतोष शिंदे, सचिन शिंदे, उपसरपंच रावसाहेब लोहकरे, प्रतीक घोरपडे, आप्पासाहेब वांढेकर, अक्षय गुंजाळ, भरत घोरपडे, नामदेव नरवडे, सुधाकर गुंजाळ, मनीष घोरपडे, सुरज गुंजाळ, रंगनाथ भवार, बबन गुंजाळ यांच्यासह वैजूबाभळगावचे ग्रामस्थ आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घडलेल्या घटनेबाबत सरपंच ज्योती घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब बाबासाहेब घोरपडे, ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे, सुशील बाबासाहेब घोरपडे, नितीन शिवनारायण घोरपडे, किशोर उत्तम घोरपडे, आंबादास उत्तम घोरपडे, गणेश विठ्ठल घोरपडे, उत्तम नामदेव घोरपडे यांच्या विरोधात पाथडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील काही जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही फरार असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.