रुईछत्तीशी जिल्हा परिषद शाळा झाली डिजिटल | पुढारी

रुईछत्तीशी जिल्हा परिषद शाळा झाली डिजिटल

रुईछत्तीशी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग डिजिटल करण्याचा निर्णय शालेय प्रशासन व ग्रामस्थांनी घेतला. आधुनिक काळात बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण पद्धती ही बदल गरजेचा आहे. रुईछत्तीशी येथील प्राथमिक शाळा डिजिटल पद्धतीकडे वाटचाल करत असल्याने मराठी शाळाही खासगी शिक्षण संस्थेच्या पुढे जात असल्याची अनुभूती येणार आहे. लहान मुलांना प्रत्यक्षात डिजिटल पद्धतीने चित्रे, नकाशे, आलेख दाखवल्यास त्यांची अध्ययन पातळी नक्कीच उंचावते. शिक्षकांनी वेळ देऊन व्यक्तीगत पद्धतीने अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाढण्यास मदत होईल.

झुंबर भांबरे, प्रवीण गोरे, रवींद्र भापकर, दिलीप गांधी, रमेश भांबरे मित्र मंडळ यांनी पुढाकार घेऊन पहिली ते चौथीचे वर्ग डिजिटल करण्यासाठी स्वखर्चातून अर्थसहाय्य केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्ष आनंदकर यांनी रंगकामासाठी पाच हजाराची देणगी दिली. सर्व ग्रामस्थ व पालकांनी शाळेसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंच विलास लोखंडे, भरत भुजबळ, रामराव गोरे, सोमनाथ गोरे, बाबासाहेब पाडळकर, राहुल गोरे, चांगदेव दरंदले, मुख्याध्यापक मंडलिक, भांबरे, गोरे, ठोकळ, पिंपळे आदी उपस्थित होते.

Back to top button