आमदार रोहित पवारांविरोधात भाजपचा कर्जतमध्ये मोर्चा | पुढारी

आमदार रोहित पवारांविरोधात भाजपचा कर्जतमध्ये मोर्चा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  आमदार राम शिंदे यांना धमकी व एकेरी उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात भाजपच्या वतीने कर्जत पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. शहरातून काढलेल्या निषेध मोर्चात आमदार रोहित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिस ठाण्यावर मोर्चा गेल्यावर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. सुनील गावडे, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, काकासाहेब तापकीर, सचिन पोटरे, अभय पाटील, काकासाहेब धांडे, मंगेश पाटील, सुनील यादव, दादासाहेब सोनमाळी,अनिल गदादे, शरद मेहेत्रे, काकासाहेब ढेरे, प्रियेश सरोदे, उमेश जपे, प्रशांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ म्हणाले, आमदार पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली. ती जनता सहन करणार नाही, भविष्यात माजी मंत्री शिंदे हेच कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी आणू शकतात. राज्यात भाजपचे सरकार आहे, हे त्यांनी विसरू नये. सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले, माजी मंत्री शिंदे यांचा अवमान करणार्‍या आमदार पवारांचा आम्ही निषेध करतो. एमआयडीसीला शिंदेंनी स्थगिती आणली, तर त्याची पुरावे पवार यांनी जनतेला द्यावेत. ा बिनबुडाची आरोप त्यांनी करू नयेत. जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे म्हणाले, माजी मंत्री शिंदे यांचा एकेरी उल्लेख करणे हे योग्य नाही. आमदार पवार यांनी केवळ स्टंटबाजी करण्यासाठी मुंबईत आंदोलन केले. यावेळी सुनील गावडे यांचेही भाषण झाले.

हेही वाचा :

धक्कादायक ! दिवसात ‘पोक्सो’चे तीन गुन्हे ; अल्पवयीन मुलींना फूस लावून शारीरिक संबंध

नाशिक : प्रवाशाचे 50 हजार लंपास, बस आणली थेट पोलिस ठाण्यात

Back to top button