राजकीय उलथापालथीत राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : आ. थोरात

राजकीय उलथापालथीत राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : आ. थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : एका बाजूला राज्यात पाऊस नसल्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला मात्र मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप आणि दिल्लीला जायचे, यायचे पडले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याची टीकामाजी कृषीमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पावसाळी अधि वेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारवर केली.  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाली आहे. या पावसाळी अधिवेशनात  बोलताना आ थोरात म्हणाले की राज्यात मान्सून उशिराने सुरू झाला आहे. मात्र, तोही म्हणावा असा पडत नाही त्यामुळे काही ठिकाणी अवघ्या २० टक्केच खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत.

तर काही ठिकाणी तर पेरण्याच झालेल्या नाही असे चित्र संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्या मुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यात अतिवृष्टी, गारपिट यामुळे खूप शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस आठ दिवसात मदत पाठवतो असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला होता. परंतु, तो अद्यापही सरकारने तोशब्द पूर्ण केला नसल्याचा आरोप आ थोरात यांनी केला तसेच सरकारनेकांदाउत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले परंतु ते अनुदानही अद्याप ही कांदा उत्पादक शेत कऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नसल्याचा आरोप आ थोरात यांनी राज्य सरकारवर केला

बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्या कडे शासनाचे दुर्लक्ष – आ थोरात

संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे खते बाजारामध्ये विक्रीसाठीआले आहेत तर काही जणांनी सरकारी टोळ्या दाखवून त्यांच्याकडून हप्ते वसूल करण्या चाही कार्यक्रम राज्यात सुरू केला आहे या गंभीर प्रकाराकडे राज्यसरकारचे दुर्दैवाने दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात यांनी केला

logo
Pudhari News
pudhari.news