

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघात आघाडीचा धर्म आमदार रोहित पवार यांच्याकडून पाळला जात नाही, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी केला. कर्जत येथे शिवसेनेचा मेळावा झाला. यावेळी आमदार शिंदे बोलत होते. कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख अभिषेक जामदार, जिल्हाप्रमुख (दक्षिण) राजेंद्र दळवी, अशोकराव गायकवाड, कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव, अमृत लिंगडे ,महावीर बोरा, युवा सेनेचे तालुकाप्रमुख दीपक गांगर्डे, सुभाष जाधव, चंद्रकांत घालमे, अक्षय तोरडमल, शिवाजी नवले, नाझीम काझी, बबन दळवी, प्रशांत बुद्धिवंत, सुलोचना दोशी, सुभाष सुद्रिक, अमोल सुपेकर, पांडुरंग जठार,अनिल यादव,पप्पू सुर्वे, कांतीलाल तोरडमल, दादा शिंगाडे, शेखर पठाडे, दादा जाधव, पोपट धनवडे, पोपट पवार, प्रवीण सुद्रिक, अक्षय भिताडे, संदीप मोरे, संदीप लोंढे, महेंद्र दोधाड, दादा घालमे मेळाव्यास उपस्थित होते.
आमदार शिंदेे म्हणाले, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचे काम भाजपने केलेे. शिवसेनेतून फुटून गेल्यामुळे चाळीस आमदारांची आज काय अवस्थाआहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच खरे अर्थाने शिवसेनेचे प्रमुख आहेत. बाळासाहेब ठाकरेंची खरे वारसदार आहेत. खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि राज्यातील जनतेने हे मान्य केले आहे. राज्यातून ठाकरे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्याची काम शिवसैनिकांनी करावयाचे आहे. यावेळी जामदार म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये माझी नेमणूक केली आहे. आगामी काळात शिवसैनिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख दळवी म्हणाले, कर्जत तालुक्यामध्ये आजही शिवसेनेची मोठी ताकद आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी आपली ताकद े दाखवून दिली. पुढील काळात कुणी सोबत आले तर ठीक. नाहीतर शिवसैनिक पुन्हा एकदा स्वबळावर सर्व विरोधकांना त्यांची जागा दाखवतील. यावेळी अमृत लिंगडे, सुभाष जाधव, दीपक गांगर्डे, शिवाजी नवले, पोपट धनवडे, महावीर बोरा यांची भाषणे झाली.
शिवसेनेच्या आमदारकीसाठी कामाला लागा
विकासकामे व शासकीय कार्यालयामध्ये शिवसैनिकांची अडवणूक केली जात असल्यास माझ्याशी संपर्क साधा. कडवा शिवसैनिक काय असतो, हे अधिकार्यांना दाखवून देऊ, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला. कर्जत-जामखेडचा पुढचा आमदार शिवसेनेचा होईल, यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
हे ही वाचा :