नगर शहरासाठी भाजपचा उमेदवार वरिष्ठच ठरवतील : खासदार डॉ. विखे | पुढारी

नगर शहरासाठी भाजपचा उमेदवार वरिष्ठच ठरवतील : खासदार डॉ. विखे

नगर : पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार निश्चित करतील. पक्षाने दिलेला उमेदवार विजयी करणे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करणे हे कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. खासदार डॉ. विखे पाटील यांनी रविवारी अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता.

दरबार संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला गती दिली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. विरोधी पक्षातील अनेकांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार आणि त्यांचे सहकारी पक्षात आले आहेत. या नव्या राजकीय समीकरणामुळे विकासात्मक कामाला वेग येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे. हे नेते कोण हे सांगण्यास मात्र खासदार विखे यांनी नकार दिला.

 

 

Back to top button