भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस

भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणात गेल्या बारा तासांत 186 दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे. धरणातील पाणीसाठा 6 हजार 189 दशलक्ष घनफुटांवर, तर निळंवडे धरणातील साठा एक हजार 846 दशलक्ष घनफुटांवर पोहचला आहे. मुळा व प्रवरा परिसरातील हरिश्चचंद्रगड, पाचनई, आंबित, बलठण, शिरपुंजे, घाटघर, रतनवाडी, पांजरे, परिसरात शुक्रवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे.

पावसाचा जोर कायम असल्याने मुळा-प्रवरा नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून मुळा व निळवंडे धरणात पाण्याची आवक वेगाने होत आहे. मान्सून सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणावर नव्याने पाण्याची आवक होत आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उबेसाठी नागरिकांनी शेकोट्या पेटविल्या आहेत. पर्यटकांंनी पाजरे फाँल, स्पिलवे गेट, रंधा धंबधबा, भंडारदरा धरण, हरिश्चंद्रगड, रतनगड परिसरात धबधबे पाहण्यासाठी नाशिक, मुंबई, शहापूर, नगर, पुणे परिसरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

24 तासांतील पाऊस (मिलिमीटर; कंसात एकूण पाऊस)
भंडारदरा 61 (774), घाटघर 120 (1241), पांजरे 85 (966), रतनवाडी 110 (1114), वाकी 51 (608) निळवंडे 1 (177)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news